इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान चीनमध्ये इस्रायली राजदूतावर प्राणघातक हल्ला झाला आहे. (Israel -Palestine Conflict) इस्रायली राजदूतावर भररस्त्यात चाकूने हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या राजदूतावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. यापूर्वी इजिप्तमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने इस्रायली पर्यटकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात दोन इस्रायली पर्यटक आणि एक इजिप्शियन नागरिक ठार झाला. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बीजिंगमधील इस्रायली दूतावासातील एका राजदूतावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. हल्ल्याचे कारण समोर आलेले नाही. (Israel -Palestine Conflict)
(हेही वाचा – PM Modi on Mumbai Visit : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर; आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे करणार उद्घाटन )
इस्रायली परराष्ट्र मंत्रालया निवेदनात म्हटले आहे, “हा हल्ला दूतावासाच्या परिसरात झाला नाही. हल्ल्यानंतर राजदूतास तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा हल्ला कशामुळे झाला ? याचा तपास संबंधित अधिकारी करत आहेत.” राजदूताची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
पॅलेस्टाईनमधील आतंकवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले. एवढेच नाही, तर हमासच्या सैनिकांनी इस्रायलच्या हद्दीत घुसून नरसंहार घडवला होता. या हल्ल्यांमध्ये 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 1500 लोक मारले गेले आहेत. (Israel -Palestine Conflict)
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील देश २ गटांत विभागले गेले आहेत. जिथे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह अनेक युरोपीय देशांनी हमासला दहशतवादी संघटना ठरवून इस्रायलच्या कारवाईचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर इराण, सौदीसह सर्व अरब देश इस्रायलच्या कारवाईला चुकीचे म्हणत आहेत.अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडा ते युरोपपर्यंत अनेक देशांमध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या समर्थनार्थ निदर्शने होत आहेत. (Israel -Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community