झारखंडची (Jharkhand) राजधानी रांची (Ranchi) येथे सरना पंथाचा सण सरहुल साजरा करणाऱ्यांवर धर्मांध मुस्लिमांनी हल्ला केला. सरहुल हा आदिवासी समाजातील प्रमुख सणांपैकी एक आहे. ज्यामध्ये निसर्गाची पूजा केली जाते आणि पुरुष आणि स्त्रिया आगीभोवती गोलाकार फिरत नृत्य करतात. दि. १ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पिथोरिया पोलिस स्टेशन परिसरातील हेथबालू येथे एक शोभायात्रा निघाली होती. त्यावेळी धर्मांधांनी हल्ला केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर घटनास्थळी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
( हेही वाचा : Tiger Memon ची संपत्ती केंद्र सरकार जप्त करणार ; विशेष न्यायालयाचा आदेश)
या प्रकरणी आदिवासी समाजाच्या बांधवांनी एफआयआर दाखल केला आहे आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. हा हल्ला होण्यामागचे कारण म्हणजे, मुस्लिम लोकानी रस्त्याच्या दोन्ही बाजूला विद्युत दिवे लावले होते. त्याचठिकाणी आदिवासी बांधवांनी सरना ध्वज फडकवला. एक दिवस आधीही यावरून दोन्ही समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वादानंतर मारामारी सुरू झाली. लाठ्या आणि काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. (Jharkhand)
या हिंसाचारात सरहुल मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या पाहनसह ८ जण जखमी झाले आहेत. धर्मांध मुस्लिमांचे म्हणणे आहे की, त्यांच्या बाजूचे चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नागदेव पाहन, रवी मुंडा, करण मुंडा, संदीप मुंडा, अरविंद मुंडा, अजय मुंडा आणि विजय मुंडा यांचा समावेश आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, आरिफ अन्सारी याने भांडणाच्या वेळी शस्त्रे दाखवली. त्याला पकडण्यात आले आहे आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, परंतु पोलिसांनी अद्याप आरोपींबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही. घटनेनंतर पंचायत प्रमुख आणि उपप्रमुख यांसारखे नेते, डीएसपी आणि पोलिस स्टेशन प्रभारी यांसारखे पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. (Jharkhand)
डीएसपी अमर कुमार पांडे (Amar Kumar Pandey) म्हणतात की, सजावटीवरून दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. समजूतीने हे प्रकरण सोडवले जात असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी (Babulal Marandi) यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या कारकिर्दीत एका विशिष्ट समुदायाचे धाडस वाढले आहे. त्यांनी आरोप केला की हेमंत सोरेन (Hemant Soren) हे सारना स्थळांचे संरक्षण करू शकत नाहीत किंवा सरहुल उत्सवाची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाहीत. (Jharkhand)
बाबूलाल मरांडी (Babulal Marandi) म्हणाले, “हेमंत सोरेन, आणखी एक नाटक करा – जसे तुम्ही आधी सरना स्थळी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला, नंतर कारवाई थांबवून कौतुक मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आता आदिवासींवर एफआयआर नोंदवा, नंतर तो रद्द करा आणि कौतुक मिळवा. आणि अशा कुटिल राजकारणाद्वारे आदिवासी समाजाला मूर्ख बनवत आणि गोंधळात टाकत राहा.” सरहुल मिरवणुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन बाबूलाल मरांडी यांनी रांची पोलिसांना केले आहे. (Jharkhand)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community