Attacks on Bangladeshi Hindus : हिंदू समाजात आक्रोशाची लाट, जळगावात कडकडीत बंद

129
Attacks on Bangladeshi Hindus : हिंदू समाजात आक्रोशाची लाट, जळगावात कडकडीत बंद
Attacks on Bangladeshi Hindus : हिंदू समाजात आक्रोशाची लाट, जळगावात कडकडीत बंद

अल्पसंख्यांक हिंदूंवर बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचारा विरोधात संपूर्ण देशभरात सकल हिंदू समाजात आक्रोशाची लाट पसरलेली आहे. या सर्व घटनेचा निषेध आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सकल हिंदू समाज एकमताने रस्त्यावर उतरलेला आहे. सकल हिंदू समाजातील सर्व व्यापारी मंडळ, फुले मार्केट, गोलाणी मार्केट, बी. जे. मार्केट, दाणा बाजार, गांधी मार्केट, शहरातील सर्व छोटे मोठे व्यापारी संकुल, एमआयडीसी परिसरातील लघुउद्योग भारती, जिंदा, भाजप उद्योग आघाडी तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी व विक्रेते संघटना तसेच शाळा महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, फुटपाथ विक्रेते सर्वांनी एकमताने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस कडकडीत दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एकत्रित आलेले आहेत. (Attacks on Bangladeshi Hindus)

(हेही वाचा – मुख्‍यमंत्री पदावरुन उबाठाचे तारे जमी पर; Ashish Shelar यांनी लगावला टोला)

महिलांचा सहभाग लक्षणीय

सकल हिंदू संघटनेने बंदची सुरुवात भवानी मातेची आरती करून पुढे नेली. आज सकाळी 9.30 वाजता सुभाष चौक येथील भवानी माता मंदिर परिसरात मोठ्या संख्येने हिंदू समाजातील विविध संघटनेतील लोक एकत्रित जमून भवानी मातेची आरती करण्यात आली त्यानंतर सकाळी 10.30 वा. शांततेत तीन तीनच्या लाईन करुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाले. मोर्च्याची सुरुवात सुभाष चौक – दाना बाजार-टॉवर चौक, शिवतीर्थ हेडगेवार चौक, स्वातंत्र्य चौक तेथून कलेक्टर ऑफिस या मार्गाने हजारोच्या संख्येने मोर्चा कलेक्टर ऑफिसला धडकला. त्यानंतर जमलेल्या सर्व हिंदू बांधवांना महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांनी संबोधित केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर

निवेदनाची प्रत राष्ट्रपतींना देखील पाठवण्यात आली आहे. सकल हिंदू समाज संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज फैजपूर, ह.भ.प गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प दीपक महाराज, विहिंपचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी, जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, रा.स्व.सं विभाग कार्यवाह अविनाश नेते , शहर संघ चालक उज्वल चौधरी , राकेश लोहार, अनिल अडकमोल , अमित भाटिया, डी. एन. तिवारी आदी उपस्थित होते. (Attacks on Bangladeshi Hindus)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.