छत्तीसगडच्या बिलासपूर येथील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या NSS शिबिरात १५० हिंदू विद्यार्थ्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना जबरदस्ती नमाज पठण करायला भाग पाडल्याचे उघडकीस आले. ३० मार्चला ईदच्या दिवशी शिबिरात आलेल्या १५० हिंदू विद्यार्थ्यांना जबरदस्ती नमाज पठण करायला लावल्याचा आरोप आहे. शिबिरात एकूण १५९ विद्यार्थी उपस्थित होते, त्यापैकी ४ जण एका विशिष्ट धर्माचे होते. त्यांना सुरुवातीला मंचावर नमाज अदा करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर एनएसएस NSS समन्वयकाने उर्वरित विद्यार्थ्यांना तीच कृती पुन्हा करण्यास भाग पाडले
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व सुरु असताना सर्वांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते, त्यामुळे थेट व्हिडिओ पुरावा नाही. मात्र, काही विद्यार्थ्यांनी याबाबत नंतर खुलासा केला असता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सध्या विद्यापीठ प्रशासनाकडून २४ तासांच्या आत या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
एनएसएसचे NSS शिबिर २६ मार्च ते ०१ एप्रिल पर्यंत चालले. ३० मार्च रोजी नमाज पठण करण्याची घटना घडली. त्यानंतर NSS समन्वयक आणि कार्यक्रम अधिकारी आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. विरोध केल्यास शिबिराचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाने ही बाब गांभीर्याने घेतली असून यासाठी त्रिसदस्यीय तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. ती लवकरच आपला अहवाल सादर करेल. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना ही घटना अधिक चिंताजनक आहे.
Join Our WhatsApp Community