मध्य प्रदेशात लव्ह जिहाद घडवण्याचा प्रयत्न, मुलीने विरोध करताच ऍसिड हल्ल्याची धमकी 

सध्या लव्ह जिहादची प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे चर्चेला जोर आला आहे. अशातच मध्य प्रदेशात हिंदू तरुणीला धर्मांतर आणि लग्नासाठी धमकावणाऱ्या मुस्लीम तरुणाला अटक करण्यात आली आहे. जर तू इस्लाम धर्म स्वीकाराला नाहीस आणि माझ्याशी लग्न केले नाहीस, तर तुझ्यावर अॅसिड हल्ला करेन, अशी धमकी त्याने नर्सिंगची विद्यार्थिनी असणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला दिली होती.

आरोपी मोनू मन्सूरी आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी

आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून तरुणीचा पाठलाग करत होता. मोनू मन्सूरी असे या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोमवारी त्याने मुलीला थांबवून तिच्यावर फुले उधळली होती. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला. आरोपी मोनू मन्सूरी आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी आहेत. मुलीने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला तिचा मोबाइल नंबर मिळाला होता. त्याने व्हॉट्सअपला मेसेज पाठवून लग्नाचा प्रस्ताव नाकारला तर हत्या करेन अशी धमकी दिली होती. मुलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘तो मुस्लीम तरुण आहे. माझा हात पकडून तो माझ्यावर ओरडला. त्याने माझ्यावर फुले फेकली आणि तुझी हत्या करेन म्हणाला. त्याने हातात बंदूक पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाठवला.’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मोनू मन्सारीला अटक करण्यात आली आहे. फसवणूक करत धर्मांतर केल्यास आणि खासकरुन लग्नासाठी असल्यास मध्य प्रदेशात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे.’

(हेही वाचा बडा कब्रस्तानला पोलीस छावणीचे स्वरूप, कब्रस्तानचा भ्रष्ट कारभार उघड करणारे आले पुढे)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here