बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकाराच्या चौकशीसाठी सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीच्या तपासात धक्कादायक खुलासे उघड होत आहेत. (Badlapur School Case)
(हेही वाचा – Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी)
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल करू नये, याकरता शाळा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाचा मानसिक छळ केल्याचा ठपका शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या दोन सदस्यीय समितीने ठेवला असल्याचे समजते.
जखम सायकल चालवल्यामुळेही होऊ शकते
पीडित मुलीच्या कुटुंबियांनी अत्याचारांची माहिती सर्वप्रथम शाळा प्रशासनाला दिली. शाळेच्या मुख्याध्यापिकेने हा प्रकार शाळेत घडलाच नाही, कुठेतरी बाहेर घडला आहे, असा दावा केला. मुलीला झालेली जखम सायकल चालवल्यामुळेही होऊ शकते, असे म्हणत मुख्याध्यापिकेने ही घटना दडपली कशी जाईल हे पाहिले. शाळा व्यवस्थापन दखल घेत नसल्याने अत्याचारग्रस्त मुलीच्या कुटुंबियांनी बदलापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तातडीने भेट घेतली. शितोळे यांनीही मुख्याध्यापिकेचीच री ओढली.
सायकल चालवल्यामुळे किंवा घरात, घराजवळही असा गैरप्रकार होऊ शकतो, असे म्हणत शितोळे यांनी शाळा व्यवस्थापनाचीच पाठराखण केली. शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या बेजबाबदारपणाबाबत चौकशी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे सुत्रांकडून समजते.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
शाळा व्यवस्थापनाने खासगी रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल अमान्य केला आणि सायकल चालवल्यामुळे जखम झाली असेल, असा दावा केला. मनसे पदाधिकारी आणि सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांच्या आग्रही मागणीमुळे पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. समिती अद्याप कोणत्या निष्कर्षांपर्यंत आली नसली, तरी चौकशी अद्याप चालू आहे. (Badlapur School Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community