ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले आहे. परचुरे यांनी अनेक नाटके, चित्रपट, मालिकांमध्ये काम केले होते. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारलेली होती. मात्र अचानक त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. (Atul Parchure )
अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी केलेली नाटके
सुप्रसिद्ध अभिनेते असणाऱ्या अतुल परचुरे (Atul Parchure )यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती,व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या मराठी नाटकांमध्ये काम केलेले आहे. अतुल परचुरे यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘वासूची सासु’, ‘प्रियतमा’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही उत्तम काम केलं. ‘सलाम-ए-इश्क’, ‘पार्टनर’, ‘ऑल द बेस्ट: फन बिगिन्स’, ‘खट्टा मीठा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.(Atul Parchure )
अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी केलेल्या मालिका
अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील गेल्या काही वर्षांमधील अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका सकारली होती. तसेच त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community