Pooja Khedkar : ‘ती’ ऑडी कार पुणे पोलिसांच्या ताब्यात

142
Pooja Khedkar : 'ती' ऑडी कार पुणे पोलिसांच्या ताब्यात
Pooja Khedkar : 'ती' ऑडी कार पुणे पोलिसांच्या ताब्यात

प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची वाशिमला बदली झाली आहे. पूजा खेडकर यांची पुण्यातील नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र या सर्वाविषयी शंका व्यक्त केला जात आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून थेट वाशीमला बदली करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी असूनही त्यांची संपत्तीचे आकडे पाहून चर्चेवर चर्चा चालू आहेत. आला आहे. त्या वापरत असलेल्या एका ऑडी (Audi) कारचीही चांगलीच चर्चा चालू आहे. हीच ऑडी कार आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

(हेही वाचा – Donald Trump यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्वीट; म्हणाले…)

कार पुणे पोलिसांच्या ताब्यात

ज्या कारवर पूजा खेडकर यांनी बेकायदेशीर लाल दिवा लावला होता, तसेच महाराष्ट्र शासन असे लिहिलेले होते, ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चतुःश्रृंगी वाहतूक विभागाच्या पोलीस ठाण्याला बॅरिकेटिंग करून ही ऑडी कार ताब्यात घेण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी याच ऑडी कारला अंबर दिव्यासह महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला होता. पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांनी कारसह कारची कागदपत्रे तपासण्यासाठी हजर रहावे अशी नोटीस बजावली होती. तसेच हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे.पूजा खेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी याऑडी कारचा 27600 रुपये दंड भरला आहे.

पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार त्यांच्या कारचालकाने अचानक रात्री पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात नेऊन जमा केली आहे. या कारवर लाल दिवा लावून पूजा खेडकर त्या आयएएस अधिकारी असल्याचे दाखवत होत्या. अनेक सरकारी कार्यालयांत जाताना त्यांनी ही कार वापरली होती. मात्र प्रशिक्षणार्थी म्हणून ही कार वापरण्याचा त्यांना अधिकार नाही. दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश दिला नव्हता.

काय आहे कारचा विवाद

शासकीय नियमानुसार खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन अशा नावाची पाटी लावता येत नाही. असे असूनही पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी व्यक्तीगत ऑडी कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती. खेडकर या 2022 सालच्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांच्या या ऑडी कारला व्हिआयपी नंबर आहे. शिवाय या खासगी गाडीला लाल आणि निळा दिवा लावण्यात आलेला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.