कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्याने उचललं असं पाऊलं

एकीकडे राज्य सरकार शेतक-यांसाठी ब-याच योजना आखल्याचं सांगत असताना, दुसरीकडे औरंगाबादमध्ये शेतक-याची कर्जासाठी डोकेफोडी दिसून आली.

राष्ट्रीय बँकेतून पीककर्ज मिळत नसल्याने औरंगाबादमधील शेतकऱ्यांने स्वत:ला इजा करून घेतले. या शेतकऱ्याने स्वत:च्या डोक्याला इजा करून घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद बाजार भागात राष्ट्रीय बँकेतून पीककर्ज घेण्यासाठी हा शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून खेटे घालत होता. मात्र अद्याप त्याला बँकेतून कर्ज मिळालेले नाही त्यामुळे या शेतकऱ्याने स्वत:ला इजा करून घेतली आहे. मला मॅडमशी बोलू द्या , तुम्ही शेतक-याला काय समजता असे ओरडून शेतकरी सांगत होता, मात्र पोलिसांनी त्याला गाडीत कोंबले. या घटनेचा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

अगोदरच नैसर्गिक संकटाने त्रासला होता. हा शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही भेटला आणि त्यांना आपली गरज त्याने सांगितली. मात्र तांत्रिक कारणांमुळे या शेतकऱ्याला पीककर्ज मिळू शकले नाही. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने व्यवस्थेचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी स्वतःच्याच डोक्यावर वार करून घेतले. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आणि पोलीस या तरुणाकडे धावत गेले.

(हेही वाचा : आता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना : मुश्रिफांच्या जावयाचा १०० कोटींचा घोटाळा!)

आपला प्रश्न मांडण्यासाठी आणि व्यवस्थेचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता स्वतःवरच हल्ला करण्याशिवाय काही पर्याय राहिला नसल्याची भावना हा शेतकरी व्यक्त करत होता. मात्र ती समजून न घेता पोलिसांनी एखादा गुन्हेगार असल्याप्रमाणे त्याला पकडल्याचा व्हिडिओ सध्या चर्चिला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here