औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मविआचे सरकार कोसळण्याआधी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. मात्र या निर्णयाला अधिकृत पाया नव्हता म्हणून त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने नामांतराचा निर्णय घेतला आणि तो केंद्रात मंजुरीला पाठवला. केंद्राने शुक्रवार, २४ फेब्रुवारी रोजी याला मंजुरी दिली.
केंद्राच्या मंजुरीने आता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण अधिकृतपणे झाले आहे. औरंगाबादचे नामकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मविआ सरकार कोसळण्याच्या आधी शेवटची मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्यात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याचा निर्णय घेऊन आपण दोन्ही काँग्रेससोबत असलो तरी हिंदुत्व सोडले नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आले. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर होता म्हणून तो रद्द करून पुन्हा नामांतराचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आणि तो मंजुरीसाठी केंद्राला पाठवला, केंद्राने त्याला मंजुरी दिली आहे.
Join Our WhatsApp Community