Samruddhi Mahamarg : औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर झाले; पण समृद्धी महामार्गावर नाही दिसले

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे प्रमुख माध्यम बनले आहे.

185
औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर झाले; पण समृद्धी महामार्गावर नाही दिसले
औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर झाले; पण समृद्धी महामार्गावर नाही दिसले
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण छत्रपती संभाजी नगर असे करण्यात आले, मात्र बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर samruddhi mahamarg  औरंगाबाद या नावाचाच पुरस्कार होत असल्याचे दिसत आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूरला जोडणारा एक प्रमुख हाय-स्पीड हायवे आहे. या रस्त्यावरील सर्व पदपथांवर छत्रपती संभाजी नगर ऐवजी औरंगाबाद असे फलक लिहिले आहेत.
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे प्रमुख माध्यम बनले आहे. या दोन शहरांमधील अंतर रस्त्याने कापण्यासाठी 16 तासांचा कालावधी लागत होता, जो समृद्धी महामार्ग samruddhi mahamarg  पूर्ण झाल्यानंतर 8 तासांत पूर्ण करता येतो. हा महामार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आला आहे, परंतु, महामार्गावर ठिकठिकाणी फलकांवर औरंगाबाद असा उल्लेख असल्याने त्याकडे महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाचे (MSRDC) दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे सरकार आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करण्याचे औपचारिक काम केले. त्यास केंद्र सरकारची परवानगीही मिळाली आणि छत्रपती संभाजी नगर असे नामकरण झाल्याने औरंगजेबाची आठवण करून देणारा औरंगाबाद इतिहासजमा झाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.