“प्लास्टिकला पर्याय सुचवा, कोणीही बेरोजगार राहणार नाही”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी व्यापा-यांना प्लास्टिकला पर्याय सुचवण्याचे आवाहन केले. प्लास्टिकचे दुष्परिणामही आहेत. त्याच्या वापराने कॅन्सर होत आहे. शेवटी सरकार सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच निर्णय घेत असते. मात्र, प्लास्टिकला पर्याय काय, ते व्यापारी, उद्योजकांनी सुचवावे. अन्नधान्यावरील GST व अन्य प्रश्नांवर लवकरच व्यापा-यांची मुंबईत बैठक घेऊ. त्यावर सकारात्मक विचार करुन निर्णय घेतला जाईल, आम्हाला कोणाला बेरोजगार करायचे नाही, कोणाचे व्यवसाय बंद पाडायचे नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ काॅमर्स अॅंड इंडस्ट्री अॅंड अॅग्रीकल्चर, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अॅंड इंडस्ट्री व जिल्हा व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी महाराष्ट्र व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यापा-यांचे प्रश्न सकारात्मक विचारातून सोडवण्याचे आश्वासन दिले.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंनंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची सर्वोच्च न्यायालयात धाव, काय केली मागणी? )

राजकीय बंदमध्ये व्यापारी नसणार

  • महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्पष्ट केले की, यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने बंदचे आवाहन केले, तर त्यात व्यापारी सहभागी होणार नाहीत.
  • व्यापा-यांवर आंदोलनाची वेळ आली, तर बंद न पाळता वेगळ्या मार्गाने प्रश्न सोडवणार.
  • अन्नधान्यावरील GST निर्णय मागे न घेतल्यास, मुंबईत 50 हजार व्यापारी आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here