समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार आबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली आणि औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचीही मागणी होऊ लागली. औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) उखडून टाकावी, अशी मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. त्यांच्या या मागणीच्या संदर्भातील प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, “आम्हालाही प्रत्येकाला असेच वाटते. फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात; कारण ती कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचे (ASI) संरक्षण मिळालेले आहे.”
(हेही वाचा – Madras University चा संतापजनक उपक्रम; शिकवणार, भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करायचा ?)
‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्याच्या काळात भारताचा जीडीपी चांगला होता’, असे विधान आबू आझमी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील उमटले. आबू आझमी यांचे या अधिवेशनापुरते निलंबन करण्यात आले असले, तरी औरंगजेबाविषयीचा रोष अनेक स्तरांवर व्यक्त होत आहे.
उदयनराजे भोसले काय म्हणाले होते?
“औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. इथे उरूस भरवले जात आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community