Khuldabad मधील औरंबजेबाची कबर पुरातत्व खात्याने झाकली; परिसरात रेडझोन

106
Khuldabad मधील औरंबजेबाची कबर पुरातत्व खात्याने झाकली; परिसरात रेडझोन
Khuldabad मधील औरंबजेबाची कबर पुरातत्व खात्याने झाकली; परिसरात रेडझोन

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) खुलताबाद (Khuldabad) येथील औरंगजेबाची (Aurangzeb) कबर हा चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच औरंगजेबाची ही कबर ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व खात्याने झाकून ठेवली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद वरुन ड्रोन उडवण्यास १८ एप्रिल पर्यंत मनाई केली आहे. त्याचबरोबर खुलताबाद (Khuldabad) येथील औरंगजेबाची कबर आणि परिसर हा रेड झोन म्हणून काही काळासाठी जाहीर करण्यात आला आहे.

( हेही वाचा : नागपूर हिंसाचारात Faheem Khan सह ६ आरोंपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांचं असं म्हणणं आहे की, औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीची तोडफोडो आणि नासधूस होण्याची शक्यता आहे. तसेच त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर ड्रोनसाठी या भागात मनाई करण्यात आली आहे. त्याचवेळी औरंगजेबाची (Aurangzeb) कबर काढण्याच्या मुद्यावरून राज्यभर वाद निर्माण झाल्याने एकीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला असताना दि. १९ मार्च रोजी कबरीच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून आत कोणीही जाऊ नये, यासाठी लोखंडी अँगलला पत्रे मारण्यात आले. या माध्यमातून कबरीचे सुरक्षा कवच वाढविण्यात आले आहेत.

दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आजवर चार पक्ष, संघटनांच्या नेत्यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांच्या अहवालावरून अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी संबंधितांना जिल्हा बंदीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील माजी आमदार आणि हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी नितीन शिंदे, संभाजी महाराज प्रतिष्ठानचे नितीन पोटे, मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) आणि धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे- पाटील यांचा समावेश आहे. शिंदे यांना १२ मार्चपर्यंत जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे. पोटे यांना २५ मार्चपर्यंत, आवारे आणि एकबोटे यांना ५ एप्रिलपर्यंत जिल्हा बंदी आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.