रिक्षा-टॅक्सीने प्रवास करण्यासाठी १ ऑक्टोबरपासून अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. बेस्ट बसमधून पाच किलोमीटरपर्यंत प्रवास करण्यासाठी फक्त पाच रुपये लागतात याउलट नव्या दरपत्रकानुसार रिक्षातून पाच किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी दिवसा ७७ रुपये, टॅक्सीसाठी ९३ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच रिक्षा-टॅक्सीतून रात्रीचा प्रवास अजून महागणार असून मीटरमध्ये बदल होईपर्यंत ग्राहकांना दरपत्रक दिले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
( हेही वाचा : मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! १ ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख)
अलिकडे CNG चे दर वाढल्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. यासाठी संपाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता. अखेर परिवहन विभागाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवे भाडेदर
- रिक्षा प्रवास दिवसा भाडे – २३ रुपये
- रिक्षा प्रवास रात्रीचे भाडे – २९ रुपये
- टॅक्सी प्रवास दिवसा भाडे – २८ रुपये
- टॅक्सी प्रवास रात्रीचे भाडे – ३५ रुपये
- रिक्षातून पाच किलोमीटर प्रवास करायचा असेल तर ७१ ऐवजी ७७ रुपये आणि रात्री १२ नंतर पाच प्रवासासाठी ९६ रुपये भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.
- टॅक्सीतून पाच किलोमीटर प्रवास करायचा असल्यास ८५ रुपयांऐवजी ९३ रुपये आणि १२ नंतर टॅक्सीने पाच किमी प्रवास करायचा असेल तर १७७ रुपये भाडे असणार आहे.
याउलट मात्र साध्या बसने प्रवास करताना प्रवाशांना पाच किलोमीटरसाठी ५ रुपये तिकीट तर एसी बसचे तिकीट अवघे ६ रुपये आहे. रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागल्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.
Join Our WhatsApp Community