…तर २८ नोव्हेंबरपासून पुण्यात धावणार नाही रिक्षा! संघटनांनी दिला थेट इशारा

पुण्यातील रिक्षा संघटना या ओला, उबेर, रॅपिडो कंपन्यांकडून सुरू असलेल्या टू व्हिलर प्रवासी वाहतुकीविरोधात आक्रमक झाल्या असून येत्या २८ नोव्हेंबरपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेमुदत बंदचा इशारा पुण्यातील १२ रिक्षा संघटनांनी दिला आहे.

( हेही वाचा : मोबाईलमधून लीक होऊ शकते वैयक्तिक माहिती, तुमचे फोटोज आणि व्हिडिओ; ‘या’ चुका करत असाल, तर वेळीच सावध व्हा!)

रिक्षावाला संघटनेचा सेवा बंदचा निर्णय

गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात बेकायदा बाईक सेवेची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. या बेकायदा व्यावसायिकांमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत असून कायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या जवळपास सव्वा लाख रिक्षा चालकांच्या परिवाराला यामुळे रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे त्यामुळे रिक्षावाला संघटनेने सेवा बंदचा निर्णय घेतला आहे.

५० ते ६० हजार रिक्षा चालक २८ नोव्हेंबरपासून बंदमध्ये सहभागी

पुण्यातील ५० ते ६० हजार रिक्षा चालक २८ नोव्हेंबरपासून बंदमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती पत्रकरा परिषदेमध्ये पुण्यातील रिक्षा संघटनांनी दिली आहे. या संपूर्ण बंदमध्ये पुण्यातील १२ संघटना सहभागी झाल्या आहेत. तसेच आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी संघटनांतर्फे पन्नास रिक्षा या तयार ठेवलेल्या आहेत. यासाठी संघटनांकडून क्रमांक सुद्धा देण्यात जारी करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पुण्यात पीएमपी नंतर रिक्षा ही सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्यामुळे रिक्षा बंद झाल्या तर शहरातील प्रवासी वाहतुकीचा निश्चितच ताण वाढून नागरिकांची गैरसोय होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here