मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा – टॅक्सीचा प्रवास महागला, जाणून घ्या नवे दर

104

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सामान्यांना सर्वात मोठा फटका बसला असून आता रिक्षा- टॅक्सीची दरवाढ करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीला मान्यता देण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार आता रिक्षाचे किमान भाडे हे २३ रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे २८ रुपये असेल.

( हेही वाचा : NASA DART MISSION : पृथ्वीला लघुग्रहांपासून वाचवण्याची यशस्वी चाचणी! पहा फोटो)

१ ऑक्टोबरपासून नवे दर लागू होणार 

नवे दर लागू करावेत यासाठी रिक्षा-टॅक्सी युनियनने गेले अनेक दिवस आंदोलन करत संपाचा इशारा दिला होता. अखेर आता भाडेवाढीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत प्रवास करताना रिक्षासाठी किमान २३ रुपये तर टॅक्सीसाठी किमान २८ रुपये भाडेदर असणार आहे. १ ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.