म्हणून मुंबईत ऑटो रिक्षा होतात कमी

कोविड काळात ऑटो रिक्षांची संख्या सुमारे साडेपाच हजारांनी घटल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

79

कोविड काळात सार्वजनिक वाहतूक असलेल्या रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासावर बंदी आणत अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कुणालाही सेवा देण्यात येऊ नये अशाप्रकारचे शासनाचे निर्देश होते. त्यामुळे या कोविडचा सर्वात मोठा फटका ऑटो रिक्षांना बसला आहे. मागील वर्षात सुमारे पाच हजारांहून अधिक ऑटो रिक्षा कमी झाल्या आहेत. मुंबईत रिक्षांचा बसलेला धंदा आणि त्यामुळे बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडू न शकल्याने आता रिक्षा चालकांनीही आपल्या धंद्याला राम राम ठोकत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

रिक्षांची संख्या घटली

मुंबई उपनगरांमध्ये चार वर्षांपूर्वी म्हणजेच सन २०१८ मध्ये ऑटो रिक्षांची संख्या १ लाख ८२ हजार ६९ एवढी होती. ही संख्या कोविडपूर्वी म्हणजे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० रोजी २ लाख २७ हजार ५४ एवढी होती. परंतु कोविड काळात ही संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात २ लाख २२ हजार ८०१ एवढी होती. म्हणजेच कोविड काळात ऑटो रिक्षांची संख्या सुमारे साडेपाच हजारांनी घटल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांना कोविडचा मोठा फटका बसल्याचेही स्पष्ट होत आहे.

(हेही वाचाः कोंबड्यांच्या वाहनांवर कारवाई करण्याची भाजपाची मागणी)

टॅक्सींची संख्या किती?

एका बाजूला ऑटो रिक्षाचे प्रमाण कमी झाले असले, तरी संपूर्ण मुंबईत सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असलेल्या टॅक्सी केवळ १६०० ने वाढल्याचे दिसून येत आहे. एरव्ही टॅक्सीचे सरासरी वार्षिक वाढीचे प्रमाण हे कमी जास्त होत असले, तरी चार वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१८ मध्ये या टॅक्सींची संख्या जेवढी होती तेवढीच संख्या २०२१ मध्ये असल्याचे पहायला मिळत आहे. सन २०१८ मध्ये टॅक्सींची एकूण संख्या १ लाख २७ हजार ८९२ एवढी होती, तर सन २०२१मध्ये ही संख्या १ लाख २७ हजार ९९३ एवढी आहे. सन २०१९ मध्ये टॅक्सींची संख्या सुमारे ८ हजारांनी घटली होती आणि सन २०२० मध्ये ही संख्या ७ हजारांनी वाढलेली पहायला मिळाली होती. परंतु कोविड काळात ही संख्या केवळ १६०० ने वाढली गेली असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

रिक्षा विकण्याची वेळ

ऑटो रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोविड काळात धंदा बसत असल्याने चालकांना आपला बँकेचा हप्ता भरता आलेला नाही. बहुतांशी रिक्षा या बँक कर्जावर असून बँक आणि खासगी कर्ज देणाऱ्या संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडता न आल्याने काहींच्या रिक्षा जप्त झाल्या आहेत, तर काहींनी त्या विकल्या आहेत. त्यामुळे या रिक्षा त्यांना विकाव्या लागत असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः राणेंचे महापौरांना पत्र! म्हणाले, एखादा पेंग्विन कमी पाळा पण…)

मागील चार वर्षातील ऑटो रिक्षांची संख्या

सन २०१८: १ लाख ८२ हजार ०६९

सन२०१९: २ लाख १२ हजार ६१९

सन २०२०: २ लाख २७ हजार ०५४

सन २०२१: २ लाख २२ हजार २८३

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.