वस्त्रोद्योग विभागाच्या (Textiles Department) एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार विविध योजनांकरिता ई-टेक्सटाईल नावाचे पोर्टल तयार करण्यात येत आहे. विविध योजनांमधील लाभार्थांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून त्यांना अनुदान/अर्थसहाय्य वितरित करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही सदर प्रणालीमार्फत करण्यात येणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग विभाग (Textiles Department) आणि आयसीआयसीआय (इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) बँकेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. (Textiles Department)
सिंहगड या शासकीय निवासस्थानी झालेल्या सामंजस्य कराराच्या यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, उपसचिव श्रीकृष्ण पवार, आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रिय प्रमुख विकास देशमुख, बँकेचे प्रदेश प्रमुख सुमंत जोशी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्यावतीने वस्त्रोद्योग विभागाचे (Textiles Department) उपसचिव श्रीकृष्ण पवार, यांनी तर आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे विकास देशमुख यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. (Textiles Department)
(हेही वाचा – Senior Journalists : ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा देण्यात येणाऱ्या सन्मान निधीत ११ हजारावरून २० हजार रुपयांपर्यंत वाढ)
वस्त्रोद्योग विभागातील (Textiles Department) नागरिकांसाठी आणि उद्योजकांसाठी असलेल्या विविध अनुदानीत योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी आणि त्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ई-टेक्सटाईल/ऑफिस ऑटोमेशन नावाची प्रणाली विकसित करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात तिथल्या परिस्थितीनुसार लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती या ऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना मिळणार आहे. सदर पोर्टल मार्फत शासन आणि लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठीचे खाते सुरू करण्यात येणार आहे. बँकेमार्फत निधी शासनाच्या खात्यात आणि लाभार्थ्यांसाठी असलेल्या खात्यामधून विविध योजनेचे अनुदान पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. (Textiles Department)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community