Uttarakhand मध्ये मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे ४७ कामगार अडकले

62
Uttarakhand मध्ये मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे ४७ कामगार अडकले
Uttarakhand मध्ये मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे ४७ कामगार अडकले

उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले आहे. माना गावात झालेल्या या दुर्घटनेत ५७ कामगार बर्फाखाली अडकले आहेत. यातील १० कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

( हेही वाचा :  “शक्ती” कायदा महाराष्ट्रात कधी अंमलात आणणार? – माजी गृहमंत्री Anil Deshmukh

ही घटना बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) कॅम्पजवळील बद्रीनाथ धामपासून ३ किलोमीटरच्या अंतरावर घडली. याठिकाणी कामगार, मजूर रस्ता बांधणीचे काम करत होते. त्याचवेळी हिमस्खलन झाले आणि त्यात ४७ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), जिल्हा प्रशासन, इंडो-तिबेटीयन सीमा पोलिस (ITBP) आणि बीआरओ पथके घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. (Uttarakhand)

यासंदर्भात पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते पोलीस महानिरीक्षक नीलेश आनंद भरणे (Nilesh Anand Bharne) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगतले की, “माना सीमा भागात बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) कॅम्पजवळ एक मोठे हिमस्खलन झाले आहे. येथे ५७ कामगार रस्ते बांधणीचे काम करत आहेत. यातील १० कामगारांना आतापर्यंत वाचवण्यात आले आहे. त्यांनी गंभीर परिस्थितीतून मानाजवळील लष्करी छावणीत पाठवण्यात आले आहे.”

दरम्यान, बीआरओ (बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन) चे कार्यकारी अभियंता सीआर मीना (CR Meena) यांनी सांगितले की, हिमस्खलन झालेल्या ठिकाणी ५७ कामगार होते. त्यानंतर दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी तीन ते चार रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. पण जोरदार हिमवृष्टीमुळे बचाव पथकाला तिथे पोहोचण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडसह अनेक डोंगराळ भागांसाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस (२० सेमी पर्यंत) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बचावकार्य आणि मदत सुरुच; मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची माहिती

बीआरओकडून चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ सुरू असलेल्या रस्ते बांधकामादरम्यान अचानक हिमस्खलन झाले. यात अनेक कामगार अडकल्याची दुखद माहिती मिळाली. आयटीबीपी (ITBP), बीआरओ (BRO) आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सर्व कामगारांना सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करत आहे, असे उत्तराखंडटे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.