आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे रुग्णांची संख्या वाढत असताना भारतीयांनी सध्या आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा, असे आवाहन भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए)ने केले आहे. सध्या देशात बीएफ.७ या विषाणूचे चार रुग्ण सापडलेत, रुग्णांची संख्या वाढू नयेत म्हणून मास्क लावा, असे आवाहनही आयएमएने केले आहे.
युएसए, जपान, साऊथ कोरिया, फ्रान्स आणि ब्राझील या देशांत कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. या देशांमध्ये २५ तासांत पाच लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. देशात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी औषधे, रुग्णवाहिका तसेच ऑक्सिजन पुरवठा आदींचा अतिरिक्त साठा तयार ठेवा, अशी विनंती आयएमएने केली आहे.
आयएमएच्या सूचना –
- आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.
- सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क ठेवा.
- सामाजिक अंतर राखा.
- हात साबण तसेच सॅनिटायझनने सतत धूण्याची सवय राखालग्न तसेच राजकीय, सामाजिक कार्यक्रम टाळा.
- ताप, घशाला खवखव, खोकला आणि जुलाब होत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.
- कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या.
- सरकारने जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करा.