पुण्यातील घाटातून प्रवास करणे टाळा!

101
पुण्यात सोमवारी सायंकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पुण्याला गुरुवारपर्यंत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, या दिवसांत पुण्यातील घाट परिसरात तुफान पाऊस पडत असल्याने, प्रवास करणे टाळा, असे आवाहन भारतीय हवामान खात्याने केले आहे. या भागात धुक्यामुळे दृश्यमानतेवरही परिणाम होत असल्याने, घाईचा प्रवास जीवघेणाही ठरू शकतो.
पालघर आणि नाशकातील घाट परिसरात पावसाने अगोदरच पूरजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. या भागात सोमवारी दिवसभरात 150 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडत होता. पावसाचा कहर दुपारनंतर पुण्यातही दिसून येऊ लागला.
सोमवारी रात्री साडेअकरानंतर तासभरात लवासा येथे 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाट परिसरात सायंकाळी लोणावळ्यात 126 मिलिमीटर पाऊस झाला. लवासा येथे 137 मिलिमीटर, धायरीत 152 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुण्यातील परिसरात सावधानता बाळगून प्रवास करा. प्रवासादरम्यान आवश्यक काळजी घ्या. शक्यतो या दिवसांत प्रवास करणे टाळा. – के.एस. होसाळीकर, प्रमुख, पुणे वेधशाळा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.