रक्तसाठा असूनही रक्त देण्यास टाळाटाळ! रक्तपेढ्यांचा अमानवी कारभार

महाराष्ट्रातील २३४ रक्तपेढ्यांनी असे अमानवीय वर्तन केले आहे.

131

रक्तदान हे श्रेष्ठदान, असे ब्रीद आहे, पण जर ते रक्तच गरजू रुग्णांच्या उपयोगात आणले जात नसेल, रुग्णाला रक्ताची गरज असूनही त्याला रक्त उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात असेल, तर त्या ब्रीद वाक्याला काय अर्थ? कारण महाराष्ट्रातील २३४ रक्तपेढ्यांनी असे अमानवीय वर्तन केले आहे. त्यांच्यावर राज्य रक्त संक्रमण परिषदेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर रक्तपेढ्यांचे परवाने होणार रद्द!

रुग्णांना रक्त देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आणि रक्तसाठ्याची माहिती अद्ययावत न करणाऱ्या राज्यातील २३४ रक्तपेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्या रक्तपेढ्यांना प्रत्येकी हजार रुपये दंडवसुली करण्यात आली आहे. यापुढे देखील त्या रक्तपेढ्यांना वारंवार सूचना केल्या जात आहे, तरीही त्यांच्याकडून दुर्लक्ष होताना दिसल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून रक्तपेढ्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

(हेही वाचा : यंदा मुंबईतील ३८१ मंडळांकडे गणपती आलाच नाही!)

रक्तपेढ्यांविरोधात तक्रारी दाखल!

अशा प्रकारे आडमुठेपणा करणाऱ्या राज्यभरातील ३१२ रक्तपेढ्यांपैकी ५३ रक्तपेढ्या या मुंबईतील आहेत. त्यांच्यावर मार्च आणि एप्रिल महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. दर महिन्यात १२० हून अधिक रक्तपेढ्यांच्या तक्रारी येत आहेत. सध्या मे ते जुलै महिन्यात आलेल्या रक्तपेढ्यांच्या तक्रारी विचारात घेण्यात येत आहेत. त्यावेळी संबंधीत रक्तपेढ्याना त्यांची बाजू मांडण्यास परवानगी दिली जाते. काही रक्तपेढ्या त्यांच्याकडील रक्त साठ्याची माहिती अद्ययावत करण्यास विलंब करत आहेत. तर काही रक्तपेढ्या रक्त देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले. राज्यातील रक्तपेढ्यांना वारंवार सूचना करून नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता संक्रमण परिषदेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आणखी कठोर कारवाई केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.