Award Ceremony : मोघलांना भिडणारे मावळे तयार करण्याचे काम करतोय; सुनील पवार यांचे उद्गार

237
Award Ceremony : मोघलांना भिडणारे मावळे तयार करण्याचे काम करतोय; सुनील पवार यांचे उद्गार
Award Ceremony : मोघलांना भिडणारे मावळे तयार करण्याचे काम करतोय; सुनील पवार यांचे उद्गार

“ज्या मोघालांनी छत्रपती शंभुराजांना हाल-हाल करून मारले त्याचा बदला घेण्यासाठी, मी रायगडावर उभा राहून मोघलांना भिडणारे मावळे तयार करण्याचे काम करतो आहे,” असे उद्गार श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार (Sunil Pawar) यांनी रविवारी २८ जुलैला काढले.

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने ‘जागर शिवराज्याभिषेकाचा सन्मान शिवसमिधांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवराज्याभिषेक समितीच्या सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा शिवसन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ नाणीसंकलक अशोकसिंह ठाकूर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, बडोदा संस्थानचे वंशज डॉ. हेमंत राजे गायकवाड, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असीलता राजे हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. (Award Ceremony)

(हेही वाचा – Om Certificate : शिवाजी महाराजांची नीती वापरा; श्रध्द्धेचे युद्ध श्रध्द्धेने लढू या – रणजीत सावरकर)

स्वप्नील सावरकर यांचा मराठा तलवार देऊन सन्मान

राष्ट्रनिष्ठ लेखनाद्वारे पत्रकारितेच्या क्षेत्रात विशेष योगदान देणारे ‘हिंदुस्थान पोस्ट’चे (Hindusthan Post) संपादक स्वप्नील सावरकर (Swapnil Savarkar) यांचा श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्मरण करून देणारी मराठा तलवार देऊन हा सन्मान करण्यात आला. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार (Sunil Pawar) यांच्या हस्ते ही तलवार प्रदान करण्यात आली. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने ‘जागर शिवराज्याभिषेकाचा सन्मान शिवसमिधांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Award Ceremony)

डोळ्यांत रक्ताचे अश्रू; मनात धगधगते विचार 

यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, “शिवराज्याभिषेक हा मावळ्यांसाठी निश्चितच आनंदाचा क्षण आहे. तसा एक दुःखाचा क्षण आहे. छत्रपती शभुराजांना मोघलांनी तब्बल ४० दिवस हाल हाल करून ठार मारले, हे कोणी विसरता कामा नये. आपल्या डोळ्यात रक्ताचे अश्रू आहेत. मनात धगधगते विचार आहेत. मनात सतत एकच विचार असतो की, आपण शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यायला हवा. छत्रपती शिवजी महाराजानंतर शंभूराजांनी मोघलांच्या विरोधात जे युद्ध छेडले ते बऱ्यापैकी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अल्पायुष्य मिळाल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही,” अशी खंतही व्यक्त केली.

शिवराजाभिषेक सोहळ्याला रायगडावर या!

“आपल्या मावळ्यांचे आता हे कर्तव्य आहे की, आपण त्याचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे मी रायगडावर उभा राहून मावळे तयार करण्याचे काम करतो आहे,” असे पवार पुढे म्हणाले. तसेच प्रत्येक शिवराजाभिषेक सोहळ्याला रायगडावर उपस्थित रहाण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित मावळ्यांना केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.