महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (Maharashtra State Marathi Journalists Association) आणि कोहिनूर ग्रुप (Kohinoor Group) यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा व्रतस्थ पत्रकारिता पुरस्कार ‘हिंदुस्थान पोस्ट’ (Hindusthan Post) माध्यम समूहाचे संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह कार्यवाह स्वप्नील सावरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमिताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. (Award)
(हेही वाचा – Exit Poll : ‘एक्झिट पोल’ तोंडघशी का पडले?)
गुरुवार, ६ जून रोजी दुपारी ४ वाजता पुणे येथील सातारा रोडवरील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यावेळी दै. लोकमतच्या छत्रपती सांभाजीनगर आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, रसिका मुळ्ये आणि ज्ञानेश्वर बिजळे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, दै. लोकमतचे चेअरमन विजय दर्डा आणि दै. पुढारीचे चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित राहणार आहेत.
(हेही वाचा – ‘आकड्यांचा खेळ सुरूच राहील’, शेवटच्या मंत्रीपरिषदेमध्ये PM Narendra Modi यांचे ‘संकेत’ )
प.पू.गोविंददेव गिरी महाराज यांना जीवनगौरव पुरस्कार
या कार्यक्रमात अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू.गोविंददेव गिरी महाराज (Govinddev Giri Maharaj) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी शिववंदना या महानृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांनी दिली. (Award)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community