Award Wapsi : पुरस्कारवापसी कंपूला आता लागणार लगाम ?; संसदेत करण्यात आली शिफारस

Award Wapsi : अशा कृतीमुळे त्या पुरस्काराचाच मान राखला जात नाही, समितीची शिफारस

51
Award Wapsi : पुरस्कारवापसी कंपूला आता लागणार लगाम ?; संसदेत करण्यात आली शिफारस

देशातील एखाद्या राजकीय मुद्द्यावर किंवा धोरणावर नाराजी किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी अनेक मान्यवर, साहित्यिक, कलाकार त्यांना मिळालेले पुरस्कार परत करतात. (Award Wapsi) प्रत्येक अकादमीकडून दिला जाणारा पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान असतो. अशा अकादमी या अराजकीय संघटना असतात. ‘अशा कृतीमुळे त्या पुरस्काराचाच मान राखला जात नाही. त्यामुळे दिलेले पुरस्कार परत करणार नाही, असे आधीच संबंधितांकडून लिहून घ्या’, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे.

(हेही वाचा – Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता; पारा 35 अंशांच्या पुढे; हवामानाचा अंदाज काय सांगतो ?)

संजय झा (Sanjay Jha) यांच्या अध्यक्षतेखालील वाहतूक, पर्यटन व संस्कृती विषयावरील समितीकडून ही शिफारस करण्यात आली आहे. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

सोमवार, ४ फेब्रुवारी या दिवशी संसदेत या समितीने अहवाल सादर केला आहे. एखाद्या राजकीय मुद्द्याशी असहमती असल्यास त्यावर निषेध म्हणून अशा प्रकारे पुरस्कार (padmashri award, padma bhushan) परत दिलेल्या मान्यवरांचाही या अहवालात उल्लेख करण्यात आला. ज्या मुद्द्यांवर त्यांनी निषेध नोंदवला, ते राजकीय मुद्दे हे संबंधित सांस्कृतिक परीक्षाच्या किंवा अकादमीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचे होते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ही प्रक्रिया कायदेशीररीत्या राबवणे कठीण जाईल, असे सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे. यावर शिफारस करताना समितीने म्हटले आहे की, “सांस्कृतिक मंत्रालयाने (Ministry of Culture) भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी पावले उचलायला हवीत. जे कलाकार पुरस्कार परत देतात; पण संबंधित अकादमीशी संलग्न रहातात, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची प्रणालीही प्रस्थापित करावी.” (Award Wapsi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.