बेस्ट कामगारांमध्ये मधुमेह आजाराबाबत जनजागृती

१४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून समजला जात असून या दिनाचे औचित्य साधून सोमवारी बेस्टच्या कामगारांची दादर वैद्यकीय विभागात मधुमेह तपासणी व त्या आजाराची जनजागृती करत हा आजार कसा होण्यापासून कसा टाळता येईल याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडी मुंबई ‘संयोजक’ बेस्ट कामगार नेते सुनिल गणाचार्य, बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिलकुमार सिंघल, अभियांत्रिकी विभागाचे विविध अधिकारी व कामगार उपस्थित होते.

मधुमेह आजार म्हणजे काय?

मधुमेहाच्या या जनजागृती आणि तपासणी शिबिरात अनिलकुमार सिंघल यांनी उपस्थित अधिकारी व कामगार यांच्याशी मधुमेहाच्या आजाराबाबत  चर्चा केली. यावेळी त्यांनी मधुमेह आजार म्हणजे काय? तो कसा होतो? त्याचे दुष्परिणाम काय होतात? याबाबत माहिती दिली तसेच मधुमेहाचा आजारापासून लांब राहायचे असेल तर खाण्यामध्ये कोणता आहार आणि कधी घ्यायचा, शरीराला आवश्यक तसा व्यायाम कधी आणि कसा करायचा याबाबतही विस्तृतपणे माहिती दिली.

काय म्हणतात जाणकार?

कामगार नेते सुनिल गणाचार्य यांनी मधुमेहाबद्दल सांगताना, कामगार जाणीवपूर्वक ह्या आजाराकडे दुर्लक्ष करतो, पण त्याचे परिणाम त्यांच्या तब्येतीवर येणाऱ्या दिवसात दिसतात. मग तो मधुमेह कमी करण्यासाठी डॉक्टरांकडे धावपळ सुरू होते.  मधुमेहामुळे इतर आजार झाल्यास मग विविध तपासण्या कराव्या लागतात. त्यासाठी मग अधिक पैसाही खर्च होतो. योगायोगाने त्याचा मानसिक व आर्थिक त्रास कुटुंबाला सहन करावा लागतो. तेव्हा प्रत्येकाने साखरेवर व इतर गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवे, त्याचबरोबर जमेल तसा व्यायामही करायला पाहिजे. जेव्हा हे तुम्ही कराल, तेव्हा तुम्ही व तुमचे कुटुंब सुखी, आनंदी होईल असे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here