अयोध्या, (ayodhya) काशी आणि मथुरा (Kashi, Mathura) ही पवित्र ठिकाणे आहेत. ज्या पद्धतीने श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिरदेखील निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस हे आळंदीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी गीत- भक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. (Ayodhya)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आयोध्या, काशी आणि मथुरा ही ठिकाणे अत्यंत पवित्र आहेत. ज्या पद्धतीने राम जन्मभूमी निर्माण झाली, त्या पद्धतीने मथुरा येथे कृष्ण मंदिर निर्माण व्हावे ही लोकांची अपेक्षा आहे. मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत राम मंदिर निर्माण झाले. त्याच पद्धतीने श्रीकृष्ण मंदिर सौहार्दपूर्ण वातावरणात निर्माण होईल, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. आळंदी मध्ये गीत- भक्ती अमृत महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाला फडणवीस आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले.
(हेही वाचा –Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांचा टोला; जे शरद पवार काँग्रेस काळात CBI ला पोपट म्हणायचे, तेच आता… )
Join Our WhatsApp Community