अयोध्या (Ayodhya) येथील प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन प्रत्येक रामभक्ताला घेता यावे यासाठी भाजपकडून ७ फेब्रुवारीला नया अकोला स्थानकावरून अयोध्या आस्था स्पेशल ट्रेन सकाळी ५ वाजता सुटणार आहे. रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला जाण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आली. प्रत्येक राम भक्ताला अयोध्येत जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन घेता यावे याकरिता भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण यांच्याकडून नया अकोला स्थानकावरून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता अयोध्या आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येच्या दिशेने रवाना होणार आहे.
(हेही वाचा – Pune Crime : पोलीस स्थानकातच चोर-पोलिसाचा खेळ, पुण्यातील ४ पोलीस निलंबित, वाचा नेमकं काय घडलं… )
प्रवाशांसाठी सूचना…
अमरावती जिल्ह्यातील रामभक्तांना प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. अतिशय माफक शुल्कात अमरावती ते अयोध्या असा प्रवास होणार आहे. निवास, भोजन व्यवस्था, अल्पोपहार यासह विविध बाबी त्यामध्ये अंतर्भूत आहेत. प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या श्रीराम भक्तांनी आपल्या नावाची नोंद ३१ जानेवारी दुपारी २ वाजेपर्यंत भाजपा मंडळ अध्यक्षांकडे करावी, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे. सोबत आधार कार्ड व जवळच्या व्यक्तीचा संपर्क तसेच थंडीचे वातावरण असल्याने शाल,स्वेटर असे उबदार लोकरीचे उबदार कपडे व आवश्यकतेप्रमाणे आपापले साहित्य घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीकरिता भाजपा सरचिटणीस नितीन गुडधे – पाटील, अयोध्या आस्था स्पेशल ट्रेन अभियान संयोजक राजेश पाठक, दर्यापूर विधानसभेचे मनीष मेन, कमलकांत लाडोळे, तिवसा विधानसभेचे संजय चांडक, अचलपूरचे गजानन कोल्हे, प्रवीण तोंडगावकर, धारणीचे सुमित चावरे यांच्यासह भाजपा मंडळ अध्यक्षांशी संपर्क करावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community