दिवाळीत Ayodhya नगरीत घडणार नवा विक्रम; २८ लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या

88
दिवाळीत Ayodhya नगरीत घडणार नवा विक्रम; २८ लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या
दिवाळीत Ayodhya नगरीत घडणार नवा विक्रम; २८ लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या

अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीराम यांच्या मूर्तींची प्राणीप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच यावर्षी भव्य अशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष योजना आखली असून २८ लाख दिवे दीपावलीच्या शुभमुहुर्तावर प्रज्वलित केले जाणार आहेत.

( हेही वाचा: Crime : लघुशंका केली म्हणून प्रेयसीच्या ४ वर्षांच्या मुलाची हत्या, प्रियकराला अटक

अयोध्येतील (Ayodhya) सरयू घाट आणि प्रभू श्रीराम मंदिरासह इतर ठिकाणी २८ लाख दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. यामध्ये अयोध्येतील ५५ घाटांचा गी समावेश असणार आहे. दरम्यान दि. २८ ऑक्टोबरपासून दिवे लावण्याचे काम सुरू झाले आहे. या दिवे लावण्याच्या कामासाठी विशेष स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच हे काम धनत्रयोदशीपूर्वी पूर्णत्वास येईल, अशी तरतुद करण्यात आली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद व्हावी यासाठी त्यांच्या एका टीमलाही आमंत्रित करण्यात आले आहे.

दरम्यान पहिली दिवाळी भव्यदिव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे दिवे प्रज्वलानासाठी नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांचे म्हणणे आहे. या कामात ३० हजार स्वयंसेवकांचा सहभाग असून प्रज्वलित होणाऱ्या दिव्यांसाठी ९२ हजार लिटर मोहरीचे तेल वापरण्यात येणार आहे. . घाटांव्यतिरिक्त मंदिर परिसरातही दिवे लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य प्रांगणासाठीही विविध प्रकारचे दिवे लावण्यात आले आहेत.(Ayodhya)
राममंदिरासाठी विशेष व्यवस्था

श्रीराम मंदिराच्या आत लावले जाणारे दिवे काजळी आणि धूर सोडणार नाहीत. त्यामुळे मंदिराच्या भिंतींवर खुणा किंवा डाग पडणार नाहीत. तसेच मंदिराच्या गर्भगृहासाठी विविध प्रकारचे दिवे बनवण्यात आले असून गर्भगृहाव्यतिरिक्त मंदिर परिसरातही १ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. हे दिवे मोहरीच्या तेलाने प्रज्वलित केले जातील. त्याचबरोबर श्रीराम मंदिरात दिव्यांशिवाय फुलांची सजावटही करण्यात आली आहे. सध्या राम मंदिर ५० क्विंटल फुलांनी सजवण्यात येत आहे. यासोबतच मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर कमानी बांधण्यात आल्या आहेत.(Ayodhya)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.