अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या चरण पादुकाही स्थापन केल्या जाणार आहे. या पादुका २२ जानेवारी २०२४ स्थापन होतील. या चरण पादुका १ किलो सोने आणि ७ किलो चांदीपासून बनवलेल्या आहेत.
हैदराबादचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका बनवल्या आहेत. सध्या या पादुका देशाटनावर आहेत. रविवारी त्या रामेश्वर धाम येथून अहमदाबादेत आणल्या. त्यानंतर त्या आधी पूज्य सोमनाथ ज्योतिर्लिंग धाम द्वारकाधीशनगरी व त्यानंतर बद्रीनाथ धाम येथे नेल्या जातील. श्रीचल श्रीनिवास यांनी या पादुका हातात घेऊन ४१ दिवस अयोध्येत निर्माणाधीन मंदिराची प्रदक्षिणाही केली आहे.
(हेही वाचा – Ind vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेत यजमानांविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणार अर्शदीप पहिला भारतीय गोलंदाज )
दगडी फरशी आणि खांबकामावर अखेरचा हात…
अयोध्येतील राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. आता कलाकार दगडी फरशी आणि खांबकामावरून अखेरचा हात फिरवत आहेत. डिसेंबरअखेर पहिल्या मजल्याचे फिनिशिंग आणि बांधकाम पूर्ण करण्याचा दावा राम मंदिर ट्रस्ट करत आहे. बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी राम मंदिर संकुलातील मजुरांची संख्या ३२०० वरून ३५०० करण्यात आली आहे.
८ तासांच्या ३ शिफ्टमध्ये सतत काम चालू
मंदिर उभारणीच्या ठिकाणी व्हीव्हीआयपींच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मंदिर उभारणीची गती कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहावी हा यामागील ट्रस्टचा उद्देश आहे. मंदिराचे बांधकाम L&T आणि TAC च्या अभियंत्यांच्या देखरेखीखाली प्रत्येकी ८ तासांच्या ३ शिफ्टमध्ये सतत चालू आहे.
(हेही वाचा –Mumbai pollution: मुंबईमध्ये प्रदूषणात वाढ, वाहतूक पोलिसांकडून ५३ हजारांपेक्षा जास्त वाहनांवर ई-चलन जारी )
श्री भक्त अंजनेय मंदिर…
अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू समाजाकडून मेरीलँडच्या फ्रेडरिक सिटी ते वॉशिंग्टन डीसीपर्यंत कार रॅली काढली. याशिवाय राम मंदिराच्या अभिषेक पूजनापर्यंत महिनाभर येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविक अयोध्येतील श्री भक्त अंजनेय मंदिरात रॅलीसाठी जमले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community