अयोध्येतील राममंदिराचे संपूर्ण बांधकाम जून २०२५ पर्यंत नाही, तर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. मंदिराच्या भोवताली प्रदक्षिणा घालण्यासाठी परकोटा बांधकामात एक किलोमीटरचा परिघ आहे. त्यात ६ मंदिरे बांधली जाणार आहेत. त्यांच्यासाठी ८.५० लाख घनफूट बनशी पहारपूर दगडाची आवश्यकता आहे. दगडही आले आहेत; परंतु २०० कामगारांच्या कमतरतेमुळे बांधकामाला विलंब होत आहे, अशी माहिती बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – नेपाळचे नवे पंतप्रधान KP Sharma Oli यांना चीनच जवळचा; भारताआधी जाणार चीनच्या दौर्यावर)
नृपेंद्र मिश्रा पुढे म्हणाले की, श्रीराममंदिरात बसवलेले संगमरवरी दगड अनेक ठिकाणी कमकुवत दिसत आहेत. यामुळे कमकुवत मार्बल काढून मकराना मार्बल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीराममंदिराच्या तळमजल्यावरील गुढी मंडपाच्या भिंती आणि खांब यांवर पांढरा संगमरवर वापरण्यात आला आहे, तसेच गर्भगृह वगळता मंदिराच्या पहिल्या मजल्यावर संगमरवर बसवण्यात आले आहे.
नृपेंद्र मिश्रा म्हणाले, “राम मंदिर पूर्ण करण्याची अंतिम मुदत यापूर्वी जून 2025 निश्चित करण्यात आली होती. कामगारांच्या कमतरतेमुळे याला आणखी तीन महिने लागू शकतात. सभागृह, सीमा आणि परिक्रमा मार्ग यासारख्या संरचना अजूनही बांधायच्या आहेत. मंदिरातील सर्व मूर्ती डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, असे आश्वासन शिल्पकाराने दिले आहे.
जयपूरमध्ये राम दरबारची मूर्ती, सात मंदिरांचील मूर्ती आणि इतर अनेक पुतळे तयार केले जात आहेत. डिसेंबरअखेरीपर्यंत मूर्ती अयोध्येतही येतील. ते कुठे ठेवायचे, याचा निर्णय घेतला जाईल. ट्रस्टने आधीच मंजूर केलेल्या राम लल्लाच्या दोन मूर्तींनाही योग्य जागा दिली जाईल, असे मिश्रा यांनी सांगितले. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community