तब्बल ५०० वर्षांच्या संघर्षानंतर रामलला २२ जानेवारी रोजी आपल्या मंदिरात (Ayodhya Ram Mandir) विराजमान झाले. तेव्हापासून सतत भाविकांची गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशातून भक्त अयोध्येत आपल्या लाडक्या रामललाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. अशातच आता अयोध्या नगरी आगामी रामनवमीसाठी सज्ज होताना दिसत आहे. मंदिर झाल्यापासून ही पहिली रामनवमी असणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साह खूप आहे.
(हेही वाचा – Rashmi Barve यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार)
मिळालेल्या माहितीनुसार रामनवमीच्या (Ayodhya Ram Mandir) दिवशी सुमारे ३० ते ४० लाख भाविक अयोध्येत पोहोचण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनानेही आगामी रामनवमीची तयारी सुरू केली आहे. (Ayodhya Ram Mandir)
जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु :
राम जन्मोत्सवादरम्यान (Ayodhya Ram Mandir) रामललाच्या भक्तांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी त्यांच्या मुक्कामाची तसेच अन्न आणि वाहतुकीची अधिक चांगली व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय आता राम भक्तांना कडक उन्हात आराम देण्यासाठी पाण्याच्या बाटल्या देखील दिल्या जातील. रामभक्तांचे पाय जळणार नाहीत, यासाठी तागाच्या चटया जमिनीवर ठेवल्या जातील. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – Israel : इस्रायलच्या कोलमडलेल्या व्यवस्थेला भारताचा आधार; 1 हजार भारतीय कामगार रुजू)
भक्तांसाठी मंदिर २४ तास खुले राहणार :
१७ एप्रिल रोजी ऐतिहासिक रामनवमी (Ayodhya Ram Mandir) अयोध्येत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यामुळेच राम मंदिर ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनही राम भक्तांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. राम भक्तांच्या सोयीसाठी मंदिराची दारेही तीन दिवस सातत्याने उघडली जातील. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत नवरात्री साजरी केली जाते. त्यामुळे १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी राम मंदिर २४ तास खुले असतील. यावेळी केवळ सजावट आणि आरतीसाठी मंदिर बंद राहील. उर्वरित सर्व वेळ तुम्ही दर्शन घेऊ शकता. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community