काश्मीरमधल्या बर्फाच्छादीत शिखरांपासून ते उन्हात न्हाऊन निघालेल्या कन्याकुमारीतील समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, रामनामाच्या जयघोषाने भारतभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आता अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) ऐतिहासिक राम मंदिराच्या स्वरूपात ही भक्ती मूर्त रूप धारण करत आहे. हे भव्य मंदिर केवळ भव्यतेच्या बाबतीतच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या योगदानाच्या माध्यमातूनही भारताच्या एकता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून खंबीरपणे उभे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले.
(हेही वाचा – Ayodhya Rammandir : आज अयोध्या सजली…; रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सिद्धता पूर्ण)
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ –
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पना या मंदिरासमवेत प्रतिध्वनीत होत आहे.मंदिराच्या तीर्थयात्रेत राष्ट्राला एकत्र आणत कोणत्याही सीमेपलीकडे जात एक अतूट विश्वास आणि उदारतेचा हे मंदिर (Ayodhya Ram Mandir) दाखला देते.
मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) गाभारा राजस्थानच्या मकराना संगमरवराच्या मूळ पांढऱ्या नजाकतीने सुशोभित आहे. कर्नाटकातील चर्मोथी वाळूच्या दगडाने, देवतांच्या मूर्ती घडवल्या आहेत. तर राजस्थानातील बन्सी पहाडपूर येथील गुलाबी वाळूचा दगड प्रवेशद्वारावरील आकृतीमध्ये वापरण्यात आला आहे.
(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : श्रीरामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापना दिवस ही हिंदूंची दिवाळी)
देशाच्या विविध भागातून आलेले योगदान –
संपूर्ण देशाचे हे योगदान केवळ बांधकाम साहित्यापुरते मर्यादीत नाही, तर त्याही पलीकडे आहे. गुजरातचा दानशूरपणा ध्वनित करत गुजरातमधून आलेली एक भव्य २१०० किलो वजनाची अष्टधातुची घंटा, मंदिराच्या भव्य दालनात वातावरण नादमय करेल. या दैवी घंटेसोबतच, अखिल भारतीय दरबार समाजाने तयार केलेला नगारा नेणारा ७०० किलो वजनाचा रथ देखील, गुजरातने दिला आहे. प्रभू रामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला काळा पाषाण कर्नाटकातील आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या भागांमधून, या तिर्थक्षेत्राचे प्रवेशद्वार म्हणून उभे असलेले नाजूक कोरीवकाम केलेले लाकडी दरवाजे आणि हाती विणलेले वस्त्र आले आहे. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – Ram Janmabhoomi Movement : रामजन्मभूमी आंदोलनाचे राजकीय परिणाम)
योगदानांची यादी इथेच संपत नाही. पितळेची भांडी उत्तर प्रदेशातील, तर पॉलिश केलेले सागवानी लाकूड महाराष्ट्रातून आले आहे. राममंदिराची कथा केवळ साधने आणि भौगोलिक योगदानाशीच निगडीत नाही. राम मंदिर निर्मितीची ही प्रक्रिया, या पवित्र कामात आपले शरीर, मन, आत्मा आणि कौशल्य ओतलेल्या असंख्य प्रतिभावान कारागीर आणि हस्तकला कारागीरांची कथा विदीत करते. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी प्राण त्यागणारे Devidin Pandey कोण होते?)
राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) हे अयोध्येतील केवळ एक वास्तू नव्हे ; श्रद्धेच्या एकत्रित सामर्थ्याचा तो जिवंत वस्तुपाठ आहे. प्रत्येक पाषाण , प्रत्येक कोरीव काम, प्रत्येक घंटा, प्रत्येक वस्त्र-कापड, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची कथा सांगते. ही कथा भौगोलिक सीमा ओलांडून सामूहिक आध्यात्मिक प्रवासात असंख्य मने परस्परांशी जोडते. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community