Ayodhya Ram Mandir : दादरच्या फेरीवाल्यांकडून दिवसभर राम नामाचा जयघोष; लाडू, प्रसाद आणि महाप्रसादाचे दिवसभर वाटप

अयोध्येतील श्री राम जन्मभूमीतील मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या सोमवारी होत असल्याने यादिवशी संपूर्ण देशभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीचे औचित्य साधून मुंबईतील अनेक भागांमध्ये उत्सव साजरा केला जात आहे. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी दादर रानडे मार्गावरील सर्व फेरीवाले आपला व्यवसाय बंद ठेवणार असून यादिवशी सुमारे १ लाख लाडुंचे वाटप करणार आहेत.

638
Ayodhya Ram Mandir : दादरच्या फेरीवाल्यांकडून दिवसभर राम नामाचा जयघोष; लाडू, प्रसाद आणि महाप्रसादाचे दिवसभर वाटप
Ayodhya Ram Mandir : दादरच्या फेरीवाल्यांकडून दिवसभर राम नामाचा जयघोष; लाडू, प्रसाद आणि महाप्रसादाचे दिवसभर वाटप

अयोध्येतील श्री राम जन्मभूमीतील मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या सोमवारी (२२ जानेवारी) होत असल्याने यादिवशी संपूर्ण देशभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीचे औचित्य साधून मुंबईतील अनेक भागांमध्ये उत्सव साजरा केला जात आहे. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी दादर रानडे मार्गावरील सर्व फेरीवाले आपला व्यवसाय बंद ठेवणार असून यादिवशी सुमारे १ लाख लाडुंचे वाटप करणार आहेत. शिवाय सत्यनारायणाची महापुजा आयोजित करून पुजेचा प्रसाद तसेच महाप्रसादाचेही वाटप करत संपूर्ण दिवसभर दादर परिसरात रामाचा उत्सव साजर केला जाणार आहे. (Ayodhya Ram Mandir)

दादरमधील रानडे मार्गासह डिसिल्हा मार्ग, जावळे मार्ग, एन सी केळकर मार्गावरील फेरीवाल्यांच्या वाढत्या समस्यांमुळे नेहमीच जनता त्रस्त असते. या फेरीवाल्याचा लोकांना त्रास होत असल्याने त्यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. परंतु आता याच फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवत देशभर साजरा केल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या आनंदोत्सवात सहभागी होण्याची जोरदार तयारी केली आहे. (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा – Eknath Shinde: स्मार्ट सिटी उभारणीसाठी दावोस येथे करार, आदर्श विकास केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस)

फेरीवाल्यांनी केले महापुजेचे आयोजन

दादरमधील समस्त फेरीवाल्यांच्यावतीने रानडे मार्गावर दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दादरमधील सर्व फेरीवाल्यांच्या संघटनांच्यावतीने सकाळपासूनच लाडूचे वाटप केले जाणार आहे. दिवसभर १ लाख लाडुंचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली असून त्यामाध्यमातून प्रसादाचे वाटपही केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात ते दहा या वेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. तब्बल सात ते आठ हजार लोकांना महाप्रसादाचे वाटप करण्याचा निर्धारही समस्त फेरीवाल्यांनी केला आहे. सतयुग ते कलियुग अशा युगाची प्रतीक्षा केल्यावर अयोध्या येथे श्री रामाचे न भूतो न भविष्य असे मंदिर बनवले आहे. या आनंदोत्सवाचा एक भाग म्हणून दादरमधील सर्व फेरीवाले, रहिवाशी, दुकानदार आदी सर्वांनी मिळून सोमवारी २२ जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन केले आहे. मागील तीस वर्षांत या मार्गावर सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन झाले नव्हते. परंतु राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याचे औचित्य साधून सर्व फेरीवाल्यांनी या महापुजेचे आयोजन करत संपूर्ण दिवस दादरमध्ये श्री रामाचा जयघोष करण्याचा निर्धार केला आहे. (Ayodhya Ram Mandir)

फेरीवाल्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मते सकाळपासून दिवसभर लाडूचे वाटप केले जाईल. तब्बल एक लाख लाडुंची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे महापुजा झाल्यानंतर पुजेच्या प्रसादाचे वाटप होईल आणि त्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाचे वाटप होईल, अशाप्रकारे संपूर्ण दिवसभर विविध कायक्रम करत दादरच्या सर्व फेरीवाल्यांनी श्री रामाचा जयघोष करत एकप्रकारे आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी रानडे मार्गावर रेल्वे स्थानक ते नक्षत्र मॉल सिग्नलपर्यंत आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. यासाठी श्री रामाच्या नावाने कमानीही उभारण्यात आल्या आहेत. (Ayodhya Ram Mandir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.