अयोध्येतील ( Ayodhya) राम मंदिर उद्घाटनप्रसंगी भारतीय रेल्वेकडून रामभक्तांसाठी महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. राममंदिराच्या उद्घाटनापासून सुरुवातीचे १०० दिवस देशाच्या विविध भागांतून १ हजारांपेक्षा जास्त रेल्वे अयोध्येला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
तर गाड्यांची संख्या वाढवण्यात येईल…
अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मंगळवारी, २३ जानेवारीपासून हे मंदिर लोकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. याविषयी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेगाड्यांचे संचालन राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या काही दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी, १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. रेल्वेच्या १ हजारांहून जास्त गाड्या देशभरातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मू काश्मीर असा विविध प्रदेश आणि शहरांसह अयोध्येला जोडल्या जातील. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवण्यात येईल, अशी माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – BJP Mumbai : बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांच्या संयोजिकांच्या नेमणुकीनंतर महिला मोर्चात नाराजी?)
पुनर्विकसित स्टेशन १५ जानेवारीपर्यंत तयार…
अयोध्येत मोठ्या संख्येने पायी येणाऱ्या-जाणाऱ्यांची सोय करण्यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे तसेच दररोज सुमारे ५०,००० लोकांची ये-जा हाताळण्याची क्षमता असलेले पुनर्विकसित स्टेशन १५ जानेवारीपर्यंत पूर्णपणे तयार होईल, अशी माहित सूत्रांनी दिली आहे तसेच आतापर्यंत काही गाड्या यात्रेकरूंच्या गटाकडून अयोध्येसाठी चार्टर्ड सेवा म्हणूनही बुक केल्या जातील, अशी माहितीही रेल्वेकडून देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community