Aayodhya Ram Mandir : परदेशी भारतीय आयोध्येतील रामललावर भाळले ; ३० देशातील भाविकांनी घेतले दर्शन

कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, ३० देशांतील ९० प्रवासी भारतीयांसह ४०० भाविकांच्या समुहाने हनुमान चालिसाचे पठण आणि प्रभू श्रीरामांचा जयघोष करत रामललाचे दर्शन घेतले.

181
Ayodhya: राम मंदिराच्या शिखरावर उभारला जाणार ध्वजस्तंभ, वादळ आणि पाण्यापासून 200 वर्षे सुरक्षित राहणार; अभियंत्यांनी सांगितले...
Ayodhya: राम मंदिराच्या शिखरावर उभारला जाणार ध्वजस्तंभ, वादळ आणि पाण्यापासून 200 वर्षे सुरक्षित राहणार; अभियंत्यांनी सांगितले...

उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) आयोध्या येथील राम मंदिरात (Aayodhya Ram Mandir) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात रामनवमीचा (Ram Navmi) सन साजरा झाला. ५०० वर्षानंतर आयोध्यामध्ये पहिल्यांदाच रामनावमीचा सन साजरा झाला. त्यामुळे भाविकांमधील उत्साह द्विगुणित झाला होता. तसेच सूर्यप्रकाशाचा किरण थेट मंदिरातील रामललाच्या मूर्तीवर पडला, जो देवतेच्या “सूर्य टिळक” (Surya Tilak) प्रतीक म्हणून मानले गेले. राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. हाच सुखद अनुभव घेण्यासाठी ३० देशांतील भाविक आयोध्येत आले होते. (Aayodhya Ram Mandir)

(हेही वाचा – Solapur LS Constituency : सोलापूरातून सुनीलकुमार शिंदे निवडणूक रिंगणात ) 

१.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन

दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Shri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra Trust) सरचिटणीस चंपत राय (Chapat Ray) यांनी सांगितले की, २२ जानेवारीला मूर्तीच्या अभिषेक सोहळ्यापासून सुमारे १.५ कोटी लोकांनी आयोध्येच्या नव्याने बांधलेल्या रामजन्मभूमी मंदिरात रामललाचे दर्शन घेतले. तसेच दररोज १ लाखाहून अधिक भाविक दर्शन घेण्यासाठी मंदिरात येतात. ३० देशांतील ९० प्रवासी भारतीयांसह ४०० भाविकांच्या समुहाने हनुमान चालिसाचे पठण आणि प्रभू श्रीरामांचा जयघोष करत रामललाचे दर्शन घेतले. (Aayodhya Ram Mandir)

या देशातील भारतीयांनी घेतले दर्शन –

दर्शन घेणाऱ्यांमध्ये, ऑस्ट्रेलिया, भूतान, कॅनडा, कोलंबिया, जॉर्जिया, गयाना, केनिया, कझाकिस्तान, मलेशिया, मोझांबिक, मकाऊ, नायजेरिया, नेपाळ, नॉर्वे, रोमानिया, स्पेन, सिंगापूर, सिंट मार्टेन, तैवान प्रजासत्ताक, ताझिकिस्तान, त्रिनिदाद आणि टोबॅगो, तुवालू, तिबेट, युगांडा, युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती, उझबेकिस्तान, अमेरिका या देशांतील अनिवासी भारतीयांचा समावेश होता. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते गोपाल गर्ग यांनी केल्याची माहिती देण्यात आली. (Aayodhya Ram Mandir)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.