शिवसेना आमदार (शिंदे गट) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही २२ जानेवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. लोकप्रतिनिधींच्या आणि जनतेच्या भावना लक्षात घेता राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. (Ayodhya Ram Mandir)
शिवसेना, भाजपची मागणी
सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यांनी २२ जानेवारीला अयोध्या येथे श्री राम मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने राज्यात सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली होती. सोमवार (०१ जानेवारी) भाजपनेही मागणी केल्यामुळे लोकप्रतिनिधींकडून मागणी जोर धरू लागल्याने जनतेच्या भावनांचा आदर करत राज्य सरकार (State Govt) २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – Tadoba Jungle Safari: ताडोबातील वाहने बॅटरीवर धावणार, पर्यटकांना घेता येणार जंगलातील प्राण्यांच्या आवाजाचा आनंद)
दिवाळी साजरी होणार
शतकानूशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्री राम जन्मभूमी आयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होणार आहेत. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. (Ayodhya Ram Mandir)
विविध कार्यक्रमाचे आयोजन
या मागणीचे पत्र आमदार भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिले आहे. २२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सुमारे ५००-५५० वर्षांचा संघर्ष या प्रभू राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे. शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार या दिवसाची तमाम राम भक्तांना प्रतीक्षा आहे. त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जाता येत नसले तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community