पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने शुक्रवारी (१९ जानेवारी) रात्री अयोध्या राम मंदिरासंदर्भात (Ayodhya Ram Mandir) एक वादग्रस्त विधान केलं आहे. ‘निष्पाप मुस्लिमांच्या हत्येनंतर’ मंदिराचे उद्घाटन केले जात आहे, असे जैश-ए-मोहम्मदने आपल्या एका निवेदनात म्हंटले आहे. त्यानंतर अयोध्येमधील सर्व सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
(हेही वाचा – Arvind Kejriwal : हिंदुंची मते मिळविण्यासाठी केजरीवाल यांची ‘रामलीला’)
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होण्यापूर्वीच देशाची सुरक्षा आधीच हाय अलर्टवर (Ayodhya Ram Mandir) असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेले विधान हे अत्यंत निरर्थक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘राम मंदिर हे अल-अक्सा सारखे असेल’
जैश-ए-मोहम्मदने जाहीर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की; “अयोध्येतील राम मंदिराची (Ayodhya Ram Mandir) स्थिती ही अल-अक्सा मशिदीसारखीच होईल. अल-अक्सा मशीद हे इस्लाममधील तिसरे सर्वात पवित्र स्थळ आहे. बिगर मुस्लिमांना या ठिकाणी भेट देण्याची परवानगी आहे, परंतु तेथे प्रार्थना करण्याची परवानगी नाही.”
(हेही वाचा – Mumbai Dabbawala: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मुंबईचे डबेवालेही साजरी करणार अनोखी दिवाळी)
२२ जानेवारी रोजी होणार प्राण प्रतिष्ठा –
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा (Ayodhya Ram Mandir) २२ जानेवारी रोजी दुपारी १२:१५ ते १२:४५ दरम्यान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील आणि व्यवसायातील ७,००० हून अधिक लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले असल्याने हजारो पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community