Ayodhya Ram Mandir: ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘इतक्या’ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

92

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी बुधवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची तुफान गर्दी दिसून आली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच दोन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बुधवारी १ जानेवारीला अर्थात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या संख्येत आणखी भर पडून सुमारे ३ लाख भाविकांनी (Ayodhya devotees) दर्शन घेतल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच सूर्योदयावेळी रामलसल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये हा उत्साह दिसून आला.

यासंदर्भात राम मंदिर ट्रस्टचे (Ram Mandir Trust) सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, संपूर्ण जग ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार (Gregorian calendar) नवीन वर्ष साजरं करत आहे. हिवाळी हंगाम अन् सुट्ट्यांमुळे भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. कारण या काळात शाळा, न्यायालये आणि शेतीची कामं बंद असतात. या काळात लोक अनेकदा सुट्ट्या घेतात. पण यंदा गोवा, नैनिताल, शिमला किंवा मसुरी यांसारख्या पारंपारिक पर्यटन स्थळांऐवजी सुट्टी घालवण्यासाठी अयोध्या हे प्रमुख ठिकाण बनले आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या नावाने दिल्लीत कॉलेज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन)

अयोध्या शहर प्रशासनाने राम भक्तांनी केलेल्या या तुफान गर्दीचे नियोजन करण्यासाठी लोकांना शहरातील अनेक विभाग आणि झोनमध्ये विभाजित केले होते. या गर्दीच्या नियंत्रणासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर इथे वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आले होते. तसेच चोवीस तास वाहनांची तपासणी करण्यात येत होती, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. नववर्षाच्या एक दिवस आधीच भाविकांची इथे गर्दी व्हायला लागली होती. 

मंगळवारी सायंकाळपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन पूर्ण केलं होतं. त्यांनी राहण्यासाठी हॉटेल्स, धर्मशाळा आणि होमस्टे पूर्णपणे बुक झाले होते, कारण स्थानिक आणि बाहेरचे असे दोन्ही पर्यटक या शहरात आले होते. असेच दृश्य हनुमानगढी मंदिरातही दिसून आले. या ठिकाणी पहाटेच्या आरतीपासून संध्याकाळच्या आरतीपर्यंत ही गर्दी स्थिर होती. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गर्दीला सामावून घेण्यासाठी प्रशासनानं रामजन्मभूमी (Ram Janmabhoomi Ayodhya) मार्गावर १० अतिरिक्त अभ्यागत गॅलरी तयार केल्या होत्या. दर्शनासाठीच्या रांगेची संख्या १०वरून २० पर्यंत वाढवली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. अयोध्येचे पोलीस उपाधीक्षक आशुतोष तिवारी पुढे म्हणाले की, शहराला सात सुरक्षा क्षेत्र आणि २४ झोनमध्ये विभागण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.