रामलल्लाचा प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळा भारताच्या इतिहासातील अलौकिक क्षण. सोमवार, २२ जानेवारी ही तारीख सदैव रामभक्तांच्या स्मरणात राहील. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रामलल्लांचे मंदिर उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी सारा देश राममय झाला. याचदरम्यान काही ठिकाणी उत्साहाने, भावभक्तिने भारीत असलेले हे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम मंदिराच्या छायाचित्रावर पाकिस्तानचा झेंडा फडकवल्यामुळे एका एका व्यक्तिला अटक केली. कर्नाटकातील गडग जिल्ह्यात ही घटना घडली. या व्यक्तिने अयोध्येतील राम मंदिराच्या छायाचित्रावर पाकिस्तानचा झेंडा लावलेले छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले. या छायाचित्राखाली त्याने ‘बाबरी मस्जिद’, असे लिहिले आहे.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराला काय दिली भेट; काय आहे त्याचे महत्व)
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर गडग येथील हिंदू कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांची गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली. या गुन्हाबाबत पोलिसांनी ताजुद्दिन दफेदार नावाच्या एका व्यक्तिला अटक केली आहे. पोलिसांनी सोशल मिडियावर त्याने शेअर केलेले छायाचित्रही डिलिट केले आहे.
गडग येथील पोलीस अधीक्षक बाबासाब नेमागौड यांनी सांगितले की, हा गुन्हा केलेला आरोपी गडग येथील रहिवासी आहे. तो कोणत्या संघटनेचा कार्यकर्ता आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. फेसबुक पोस्ट बघितल्यानंतर त्याने ते छायाचित्र शेअर केले, असे त्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सांगितले. या प्रकरणाबाबत तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community