Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे विशेष चांदीचे नाणे अर्थ मंत्रालयाकडून जारी, कुठे खरेदी कराल? जाणून घ्या…

ज्यांना अयोध्येला पोहोचून रामलल्लाचे दर्शन घेता येत नाही, ते घरी बसून ऑनलाईन राम मंदिराकडून प्रसाद मागवत आहेत.

491
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे विशेष चांदीचे नाणे अर्थ मंत्रालयाकडून जारी, कुठे खरेदी कराल? जाणून घ्या...
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे विशेष चांदीचे नाणे अर्थ मंत्रालयाकडून जारी, कुठे खरेदी कराल? जाणून घ्या...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी भाविकांसाठी रामलल्ला यांचे विशेष चांदीचे नाणे जारी केले आहे. याशिवाय त्यांनी बुद्ध आणि एक शिंग असलेला गेंडा यांच्यावर असलेली आणखी दोन नाणीही जारी केली आहेत. (Ram Mandir)

ज्यांना अयोध्येला पोहोचून रामलल्लाचे दर्शन घेता येत नाही, ते घरी बसून ऑनलाईन राम मंदिराकडून प्रसाद मागवत आहेत. आता लोक रामलल्ला आणि राम मंदिरावर बनवलेली चांदीची नाणीही खरेदी करू शकणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १५ फेब्रुवारी रोजी ३ नाणी जारी केली. यामध्ये १ नाणे रामलल्ला आणि रामजन्मभूमी (Ram Mandir) मंदिर अयोध्या यावर आधारित आहे. सरकारच्या अधिकृत साइटवरूनही ही नाणी खरेदी करता येतील.

शुद्ध चांदीपासून बनवले चांदीचे नाणे…
ही चांदीची नाणी ५० ग्रॅम वजनाची असून ९९९ शुद्ध चांदीपासून बनवलेली आहेत. या नाण्याच्या एका बाजूला अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहात बसल्याचे चित्र आहे.

(हेही वाचा – BMW 5 Series 2024 : बीएमडब्ल्यू ५ सीरिजची जागतिक सफर सुरू, भारतातही येण्याची शक्यता )

राम मंदिराचे नाणे कुठे खरेदी कराल?
रामलल्ला आणि अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या संदर्भात जारी केलेले हे नाणे ५० ग्रॅम वजनाचे असून ते शुद्ध चांदीचे आहे. त्याची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. हे नाणे घरात किंवा देवाऱ्ह्यात ठेवण्यासाठी लोकं खरेदी करत आहेत तसेच भेट देण्याकरिता भेटवस्तू म्हणून या नाण्याची खरेदी करणे हा उत्तम पर्याय मानला जात आहे.

कुठे खरेदी कराल?
सरकारचे अधिकृत संकेतस्थळ https://www.indiagovtmint.in/souvenir-coinsया साईटवर नमूद केलेली प्रक्रिया करून पूर्ण करून रामलल्ला आणि राम मंदिराचे चांदीचे नाणे खरेदी करू शकता.

(हेही वाचा – FIH Hockey Pro League : हॉकी प्रो लीगमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ४-६ ने पराभव )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.