भारतासह जगभरातील हिंदूंसाठी उत्साह आणि भक्तीभाव वाढवणाऱ्या अयोध्येतील श्रीराममंदिरामध्ये (Ayodhya Ram Mandir) रामलला विराजमान होणार आहेत. २२ जानेवारी रोजी होणारा हा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी जगभरातील ५५ देशांतील १०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मात्र या मंदिरात रामललाची कोणती मूर्ती स्थापित करण्यात येणार यावर जोरदार चर्चा सुरु होती. अखेर याचा निर्णय झाला आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज आणि साकारलेल्या रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
कर्नाटक के प्रसिद्ध मूर्तिकार श्री अरुण योगीराज द्वारा कृष्णशिला पर निर्मित मूर्ति का चयन भगवान श्री रामलला सरकार के श्री विग्रह के रूप में प्रतिष्ठित होने हेतु किया गया है।
The Murti sculpted on Krishna Shila, by renowned sculptor Shri Arun Yogiraj, has been selected as Shri…
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 15, 2024
तीन मूर्तींपैकी एका मूर्तीची निवड या मंदिरासाठी करण्यात आली
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याची पुष्टी केली. याविषयाची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून शेअर केली आहे. Ayodhya Ram Mandir मध्ये तीन मूर्तींपैकी एका मूर्तीची निवड या मंदिरासाठी करण्यात आली आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटवर यापूर्वी लिहिले होते की, ‘जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे. अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेकासाठी या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत प्रतिष्ठापना होणार आहे. राम आणि हनुमान यांच्या अतूट नात्याचे हे प्रतीक आहे. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकातील अरुण यांनी रामललाची मूर्ती साकारणे ही एक महत्त्वाची सेवा आहे.
Join Our WhatsApp Community