सध्या संपूर्ण अयोध्यानगरी येथे रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरू आहे. हा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता अयोध्या राम मंदिरात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. समारंभ सुरळीत पार पडावा यासाठी प्रतिष्ठापना समारंभाच्या सुरक्षेबाबत अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. प्रतिष्ठापनेच्या दिवशी प्रवेशाबाबत एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आणि मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी या महत्त्वाच्या मुद्द्यांचे पालन करणे आवश्यक आहे. (Ayodhya Ram Mandir)
राम मंदिरात प्रवेशासाठीचे नियम जाणून घेऊया.
राम मंदिरात परवानगी नसलेल्या वस्तू : रामललाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी, कार्यक्रमासाठी राम मंदिरात प्रवेश करणाऱ्यांना मोबाईल फोन, पाकीट, कोणतीही गॅझेट, इयरफोन किंवा रिमोटसह चावी यासारख्या वस्तू घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. संतांच्या मोठ्या छत्र्या, पिशव्या, पूजेसाठी वैयक्तिक मूर्ती, सिंहासने आणि गुरु पादुका देखील कार्यक्रमस्थळी आणण्यास मनाई आहे. (Ayodhya Ram Mandir)
अभिषेक सोहळ्याचे नियमः रामललाच्या अभिषेकाल उपस्थित असलेल्या पाहुण्यांना 22 जानेवारी रोजी सकाळी 11:00 च्या आधी कार्यक्रमस्थळी प्रवेश करावा लागेल.सुरक्षेच्या बाबतीत, जर कोणतेही सुरक्षा कर्मचारी एखाद्या संत किंवा आध्यात्मिक नेत्यासोबत असतील, तर त्यांना कार्यक्रमस्थळाच्या बाहेर राहावे लागेल.
(हेही वाचा : Jodhpur – Bhopal Express चे दोन डबे घसरले; अपघातामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित)
ज्यांना निमंत्रण त्यांनाच मंदिरात प्रवेश: ज्या व्यक्तीचे नाव निमंत्रण पत्रावर असेल त्यालाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. त्यांच्याबरोबर असलेल्या सेवकांना किंवा शिष्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही.राम मंदिराचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिर परिसरातून बाहेर पडल्यानंतरच संतांना रामललाच्या दर्शनाची परवानगी देतील.
कोणताही ड्रेस कोड लागू केलेला नाही : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी अनेक लोक पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करणार आहेत. त्यामध्ये पुरुष धोती, कुर्ता-पायजमा आणि स्त्रिया पंजाबी ड्रेस किंवा साड्या घालू शकतात. मात्र, राम मंदिर ट्रस्टने याबाबत कोणताही ड्रेस कोड लागू केलेला नाही.तसेच कर्तव्यावर असलेल्यांनाच अयोध्येत प्रवेश दिला जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community