Ayodhya Ram Mandir ट्रस्टने सरकारकडे भरला ‘इतका’ टॅक्स

165
Ayodhya Ram Mandir ट्रस्टने सरकारकडे भरला 'इतका' टॅक्स
Ayodhya Ram Mandir ट्रस्टने सरकारकडे भरला 'इतका' टॅक्स

श्रीराम (Ayodhya Ram Mandir) जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास (Mahant Nritya Gopal Das) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात 7 ट्रस्टी आणि 4 विशेष आमंत्रित सदस्य उपस्थित होते. विशेष आमंत्रित म्हणून केशव पराशरण, विमलेंद्र मोहन मिश्र, युगपुरुष परमानंद, नृपेंद्र मिश्र उपस्थित होते. (Ayodhya Ram Mandir)

हेही वाचा-इस्रोच्या Chandrayaan-5 मोहिमेला केंद्र सरकारची मान्यता

बैठकीत राम मंदिराच्या निर्मितीच्या प्रगतीवर चर्चा झाली. महामंत्री चंपत राय (Champat Rai) यांनी सांगितले की 5 फेब्रुवारी 2020 रोजी ट्रस्टची निर्मिती झाली होती. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत म्हणजे गेल्या 5 वर्षांत ट्रस्टच्या खात्यातून सरकारच्या विविध विभागांना 396 कोटी रुपयांचा कर दिला आहे. (Ayodhya Ram Mandir)

हेही वाचा-Pakistan चे सैन्य हादरले; सामूहिक राजीनामे देण्याचे सत्र सुरु

ट्रस्टने जीएसटी 272 कोटी, टीडीएस 39 कोटी, लेबर सेस 14 कोटी, ईएसआय 7.4 कोटी, विमामध्ये 4 कोटी, जन्मभूमीच्या नकाशासाठी अयोध्या विकास प्राधिकरणला 5 कोटी, अयोध्येतील जमीन खरेदीसाठी स्टँप शुल्क 29 कोटी, 10 कोटी वीज बिल, 14.9 कोटी रॉयल्टच्या माध्यमातून सरकारला दिले गेले आहे. त्यात दगडांची रॉयल्टी राजस्थान सरकार, कर्नाटक सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला दिली आहे. (Ayodhya Ram Mandir)

हेही वाचा-चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर International Masters League T20 मध्येही भारत बनला ‘चॅम्पियन’

राम मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे आहे. मंदिराचे 96 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. या मंदिरासाठी मागील पाच वर्षांत 400 कोटी रुपयांचा कर सरकारला भरला आहे. ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी ही माहिती दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची मणिराम दास छावनीमध्ये बैठक झाली. त्यानंतर चंपत राय यांनी ही माहिती दिली. (Ayodhya Ram Mandir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.