Ayodhya Ram Temple: अयोध्या बनले जगाची धार्मिक राजधानी, २ महिन्यांत १ कोटी भक्तांनी घेतले दर्शन; कशी केली जाते रामभक्तांची मोजणी, जाणून घ्या…

भाविकांची संख्या वाढल्यामुळे अयोध्येत रोजगाराच्या संधीही वाढत आहेत.

269
Ayodhya Ram Temple: ५०० वर्षांनी श्रीराम जन्मभूमीवर संपन्न होणाऱ्या 'रामनवमी उत्सवा'निमित्त कलाकारांनी व्यक्त केल्या भावना !

२२ जानेवारी २०२४ला भगवान श्रीराम अयोध्येतील  (Ayodhya Ram Temple) भव्य मंदिरात विराजमान झाले. रामललाच्या येण्याने अयोध्येचे जुने वैभव पुन्हा परत आले आहे. पूर्वी मागास शहर म्हणून ओळख असलेल्या अयोध्येत आता अनेक सुविधा मिळत आहेत. अयोध्या शहराला धार्मिक राजधानी अशी ओळख मिळात आहे. देशासह जगभरातून रामभक्त रामललाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीत मोठ्या संख्येने येत आहेत. दररोज सुमारे दीड ते दोन लाख भाविक रामललाचे दर्शन घेत आहेत. सुट्टीच्या दिवशी या भाविकांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ होते, अशी माहिती श्रीराम मंदिर ट्रस्टने दिली आहे.

दिवसेंदिवस भाविकांचा वाढता ओघ, यामुळे उत्पन्न होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी निर्माण होत आहेत. यामुळे आता रामनगरी अयोध्या ‘आर्थिक राजधानी’ म्हणून उदयास येत आहेत. गेल्या २ महिन्यांपासून १ कोटीहून अधिक लोकांनी रामललाचे आशीर्वाद घेतले आहेत. संपूर्ण जगात एवढ्या मोठ्या संख्येने कोणत्याही धार्मिक स्थळी भाविक पोहोचलेले नाहीत. ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेल्या व्हॅटिकन सिटीला दरवर्षी सुमारे ९० लाख लोक भेट देतात, तर गेल्या वर्षी १३.५ कोटी लोकांनी मुस्लिमांचे सर्वात मोठे पवित्र स्थान मक्का येथे भेट दिली होती. राम मंदिराबाबत बोलायचे झाले तर दररोज लाखो भाविक येत असून अवघ्या दीड ते दोन महिन्यांत सुमारे एक कोटी लोकांनी रामललाचे आशीर्वाद घेतले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार; कारणे वाचा सविस्तर…)

रोजगाराची संधी वाढली
भाविकांची संख्या वाढल्यामुळे अयोध्येत रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. शहरात सर्वत्र व्यवसाय तर विस्तारत आहेच, शिवाय रामनगरीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना रोजगाराच्या इतर संधीही उपलब्ध होत आहेत. रामनगरीमध्ये अवघ्या २ महिन्यांत एक कोटींहून अधिक लोकांनी दर्शन घेतले.

तंत्रज्ञानाच्या आधारे भक्तांची मोजणी
राम मंदिर ट्रस्टचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दावा केला की, १ कोटी २५ लाखांहून अधिक रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. लोक मक्का-मदिना येथे फक्त हजच्या वेळी जातात, ख्रिश्चन धार्मिक स्थळांनाही केवळ विशेष सणांवर जातात. पण, अयोध्येत दररोज जवळपास २ लाख लोक येत आहेत. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, राम मंदिरातील रामभक्तांची मोजणी तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अनेक सॉफ्टवेअर बसवण्यात आले असून, त्याद्वारे भाविकांची संख्या मोजली जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.