अयोध्येत रामजन्मभूमीवरील राम मंदिरात येत्या काही दिवसांतच प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला येणाऱ्या ८० हजार भाविकांच्या निवासासाठी व्यवस्था करण्यासाठी ‘टेन्ट सिटी’ वसवली जाणार आहे.
गुप्तार घाट येथे २० एकर परिसरात टेन्ट सिटी उभारली जाणार असून तिथे २० ते २५ हजार भाविकांच्या निवासाची सोय होईल. अयोध्या धाम येथील ब्रह्मकुंड परिसरातही एक टेन्ट सिटी स्थापन करण्यात येणार आहे. तिथे ३० हजार भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध असणार आहे.
(हेही वाचा – High Court: न्यायदानाचे कामकाज सुलभ होणार, सरकारकडून डिजिटल कामकाजावर भर)
२५ हजार एकर जागेत तंबू…
येथील बाग बिगेसी भागात २५ एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या तंबूंमध्ये २५ हजार लोक राहू शकतील. याशिवाय कारसेवकपुरम, मणिरामदास छापणी भागातदेखील भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिरातील तळमजल्याचे काम पूर्ण
-अयोध्येच्या राम मंदिरातील तळमजल्याच्या १८ दरवाजांवर सोन्याची कलाकुसर केली जाणार आहे.
– या मंदिरातील तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे.
– २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होईल. तळमजल्यावरील गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community