Ayodhya Ram Temple Roof Leaking : माध्यमांनीच उघड केला विरोधकांचा खोटेपणा

264
Ayodhya Rammandir Leakage : राममंदिरात पावसाचे पाणी कसे आले ?; श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने सांगितले सत्य
Ayodhya Rammandir Leakage : राममंदिरात पावसाचे पाणी कसे आले ?; श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने सांगितले सत्य

गेले काही दिवस माध्यमांमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या नूतन वास्तूत पावसाचे पाणी गळत असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत व्हायरल होत आहेत. रामलल्ला (Ayodhya Ram Temple) विराजमान असलेल्या गाभाऱ्यातच पाणी गळत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पेरून राममंदिराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नॅरेटिव्ह सेट केले जात होते. विरोधकांनी सामाजिक माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांत पसरवलेल्या या नॅरेटिव्हचा खोटेपणा प्रसारमाध्यमांनीच अधिकृत सूत्रांच्या आधारे बातम्या देऊन उघड केला. काँग्रेसचे (Congress) मुखपत्र असे ओळखल्या जाणाऱ्या दैनिक लोकमतनेच याविषयीचे वृत्त देऊन वस्तुस्थिती उघड केली आहे.

(हेही वाचा – Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात १ दहशतवादी ठार, चकमक सुरूच)

याविषयी राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सत्य समोर आणले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गळती मागील कारण म्हणजे सध्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असून, त्यामुळे छत पूर्णपणे उघडे आहे. त्यामुळे तेथे पाणी तुंबले आणि ते छतावरून खाली मोकळ्या मजल्यावर पाणी पडले. दुसऱ्या मजल्यावरील छत पुढील महिनाअखेरीस पूर्ण होणार आहे.

गर्भगृहातील पाण्याचा निचरा करण्याची आवश्यकता नाही

मंदिर पूर्ण झाल्यावर गर्भगृहात पाणी येण्यासाठी जागाच राहणार नसल्याने तिकडून निचरा करण्याची व्यवस्था जरूरीच नाही. त्यामुळे बांधकाम सुरू असतानाच्या थोड्या वेळेसाठी पाणी हाताने काढले गेले. उर्वरित सर्व मंडपांमध्ये उतार आणि ड्रेनेजची व्यवस्था आहे. त्यामुळे तेथे पाणी कधीच साचणार नाही.

रस्ता खचला नाही

राम पथावरील रस्ताही खचल्याचा अपप्रचार सुरू आहे. सहादतगंज ते नया घाट या सुमारे साडेतेरा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. जसं भासविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तसे मंदिराच्या बांधकामात कोणतीही त्रुटी नाही किंवा कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Ayodhya Ram Temple)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.