22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची तयारी देश-विदेशात उत्साहात सुरु आहे. (Ayodhya Ram mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत. मुंबईतील कारुळकर प्रतिष्ठाननेही (Karulkar Pratishthan) या आनंदात सहभाग घेतला आहे.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अरविंद केजरीवाल अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक; निमंत्रण आले नाही तरी २२ जानेवारीला सह परिवार जाणार)
अमेरिकेत विधीनुसार प्रतिकृतीची पूजा
कारुळकर प्रतिष्ठानने अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिराची प्रतिकृती अमेरिकेतील न्यू जर्सी येथे रहाणारे भारतीय वंशाचे वसंत नाईक यांना पाठवली आहे. या प्रतिकृतीची अमेरिकेत (America) विधीनुसार प्रतिकृतीची पूजा केली जाईल. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘कारुळकर प्रतिष्ठान’चे (Karulkar Pratishthan) अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांचा मुलगा विवान कारुळकर यांनी ही प्रतिकृती अमेरिकेत वसंत नाईक यांना पाठवली आहे.
अमेरिकेत मोटार रॅलीचेही आयोजन
या प्रतिकृतीच्या स्वागतासाठी अमेरिकेत 21 आणि 22 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये श्री सत्यनारायण कथा, हवन-पूजन, अभिषेक, तीर्थप्रसाद, भजन आदी कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यानंतर प्रसादवाटप केले जाईल. अमेरिकेत राममंदिराच्या प्रतिष्ठापनेनिमित्त मोटार रॅलीचेही आयोजन केले जाणार आहे. राममंदिराची प्रतिकृती पाठवल्याबद्दल कारुळकर प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे वसंत नाईक यांनी आभार मानले आहेत.
(हेही वाचा – Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांची चारही शंकराचार्यांना विशेष विनंती; म्हणाले…)
परदेशातही राममंदिराच्या प्रतिष्ठापनेचा आनंद
केवळ देशातच नाही, तर परदेशातही राममंदिराच्या प्रतिष्ठापनेची तयारी उत्साहात सुरू आहे. 22 जानेवारीला अमेरिकेत विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर (New York Times Square), बोस्टन, वॉशिंग्टन (Washington), D.C. यासह अनेक ठिकाणी रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेदरम्यान (Rammandir Pran Pratishtha) कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातील.
मॉरिशस सरकारने हिंदू अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी २ तासांची सुट्टी जाहीर केली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये रामरथ यात्राही आयोजित करण्यात आली आहे. आयफेल टॉवरजवळही थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. (Ayodhya Rammandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community