अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचा (Shree Ram Mandir) कळस हा सुवर्णजडित असेल, अशी माहिती श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दि. ६ डिसेंबर रोजी दिली. तसेच अयोध्येतील (Ayodhya) श्रीराम मंदिराच्या बाधकामाचा आढावा ही मिश्रा यांनी घेतला. यावेळी दि. ५ डिसेंबर आणि दि. ६ डिसेंबर रोजी दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत मिश्रा (Nripendra Misra) यांनी ही माहिती दिली. (Shree Ram Mandir)
( हेही वाचा : Solapur District Bank Loan Scam : महायुती सरकारची पहिली मोठी कारवाई; शरद पवार गटाच्या नेत्यांना कर्जवसुलीसाठी नोटीसा धाडल्या)
नृपेंद्र मिश्रा (Nripendra Misra) म्हणाले की, मंदिराचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी दि. १५ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली असून तोपर्यंत बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास आहे. त्याचप्रमाणे भव्य श्रीराम मंदिराच्या (Shree Ram Mandir) कळसाचा अखेरचा दहा ते १५ फूट भाग हा सुवर्णजडित असेल, अशीही माहिती मिश्रा यांनी दिली. (Ayodhya)
मिश्रा पुढे म्हणाले, मंदिर आणि मंदिर (Shree Ram Mandir) संकुलाची उभारणी वेळापत्रकाप्रमाणेच होत आहे. मंदिराच्या उभारणीसोबतच सप्तमंडप आणि परकोट्याचा तीन चतुर्थांश भागही बांधून पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे, भाविक सुविधा केंद्र, विजेची व्यवस्था आणि अन्य काही भाग ट्रस्टला हस्तांतरित करण्यात येत आहे. मंदिराची (Shree Ram Mandir) उभारणी प्रगतिपथावर असून त्यासाठी आवश्यक ते सर्व करण्यात येत आहे, असेही नृपेंद्र मिश्रा (Nripendra Misra) यांनी सांगितले. (Shree Ram Mandir)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community